शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

मिरा-भाईंदर, ठाण्यातही आता पॉड टॅक्सी धावणार; महामुंबईची वाहतूककोंडी फुटणार; एमएमआरडीए डीपीआर बनवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 08:18 IST

परिवहन विभागाकडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सोपवल्याची  माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

- महेश कोले  लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईनंतर आता मीरा-भाईंदर आणि ठाणे या शहरांमध्येही पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. मीरा-भाईंदर आणि ठाण्यात घोडबंदरपर्यंत प्रचंड वाहतूककोंडी होते. हे लक्षात घेता पॉड टॅक्सी प्रकल्प आकाराला आल्यास महामुंबईकरांचीही वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे, तसेच पर्यावरणपूरक पर्याय म्हणूनही हा प्रवास फायदेशीर ठरणार आहे. 

परिवहन विभागाकडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सोपवल्याची  माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. शहरांतील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेऊन ‘उन्नत पॉडकार वाहतूक सेवा’ ही भविष्यातील एक प्रभावी पर्याय ठरू शकते, असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यांनी वडोदऱ्यातील पहिल्या व्यावसायिक सस्पेंडेड पॉडकार प्रणालीचा आढावा घेतल्यानंतर मे महिन्यात मुंबई महानगर प्रदेशात या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत बैठकही घेतली होती. या पार्श्वभूमीवर आता मीरा-भाईंदर आणि ठाणे परिसरात १५ ठिकाणी पॉड टॅक्सी उभारणीसाठी एमएमआरडीएकडून डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

पॉड टॅक्सीची वैशिष्ट्येपॉड टॅक्सी रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता आणि कमी जागेत उभारली जाणारी यंत्रणा आहे. त्यानुसार या पॉडकारमध्ये २० प्रवासी बसू शकतात आणि ती ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावू शकत असल्याचे समोर आले. ऑनबोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी प्रणालीवर ही यंत्रणा चालते. पर्यावरणपूरक पर्याय म्हणून ती उपयुक्त ठरेल, असे अधिकारी म्हणाले.

पॉड टॅक्सी हा जलद वाहतुकीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. या प्रकल्पासाठी बीकेसीमधील जागा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केली आहे. केवळ मुंबई आणि ठाण्यातच नव्हे, तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात पॉड टॅक्सी प्रकल्प राबवण्याचा मानस आहे. - प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Pod Taxis Coming to Mira-Bhayandar, Thane; MMRDA to Prepare DPR

Web Summary : Mira-Bhayandar and Thane will soon have pod taxis to ease traffic. MMRDA will prepare the Detailed Project Report (DPR) for 15 locations. The eco-friendly system can carry 20 passengers at 60-70 kmph, offering a fast transport solution.
टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर