बोर्डी परिसरात वृक्षारोपण अत्यंत उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 03:21 IST2018-07-03T03:20:51+5:302018-07-03T03:21:25+5:30

या परिसरातील गावांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्र म उत्साहात पार पडला. या वेळी गावातील मोकळ्या जागा आणि किनार्यालगत झाडे लावण्यात आली त्यामध्ये विद्यार्थी व नागरिकांनी हिरीरीने भाग घेतला.

 Plantation in the Bordi area is very excited | बोर्डी परिसरात वृक्षारोपण अत्यंत उत्साहात

बोर्डी परिसरात वृक्षारोपण अत्यंत उत्साहात

बोर्डी : या परिसरातील गावांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्र म उत्साहात पार पडला. या वेळी गावातील मोकळ्या जागा आणि किनार्यालगत झाडे लावण्यात आली त्यामध्ये विद्यार्थी व नागरिकांनी हिरीरीने भाग घेतला.
बोर्डी ग्रामपंचायतीने आयोजिलेल्या या कार्यक्र मात जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, पंचायत समिती सदस्य प्रशांत पाटील, सरपंच प्रेरणा राठोड, उपसरपंच दिनेश ठाकोर, गटविकास अधिकारी भारक्षे, ग्रामविकास अधिकारी हितेंद्र विंदे, बोर्डीचे भाजप युवा अध्यक्ष अमेश ठाकोर विविध संस्था आणि ग्रामस्थ आदींनी वृक्षारोपण केले. किनारा, मोकळी जागा, तलावाचे बांध आदी ठिकाणी नारळ, सुरु , कडुलिंब, पिंटो, बहावा, काळीजांभळे अशा अडीचहजार झाडांचे रोपण केले.

Web Title:  Plantation in the Bordi area is very excited