पी.जे.,स्वामी विद्यालयाचा गणवेश बदलला

By Admin | Updated: May 13, 2017 00:38 IST2017-05-13T00:38:32+5:302017-05-13T00:38:32+5:30

शहरातील पां.जा. हायस्कूल व स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळांतील विद्यार्थ्यांचे पूर्वीचे गणवेश सोईचे नसल्याने ते बदलून आता

PJ, Swami Vidyalaya changed uniforms | पी.जे.,स्वामी विद्यालयाचा गणवेश बदलला

पी.जे.,स्वामी विद्यालयाचा गणवेश बदलला

लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : शहरातील पां.जा. हायस्कूल व स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळांतील विद्यार्थ्यांचे पूर्वीचे गणवेश सोईचे नसल्याने ते बदलून आता या वर्षीपासून नवीन गणवेशात विद्यार्थी दिसणार आहेत. पूर्वी तोकडे गणवेश असल्याने विशेषत: विद्यार्थींनींची कुचंबना होत होती. याची दखल मनसे विद्यार्थी सेनेने घेऊन तशा प्रकारचा पत्रव्यवहार दोन्ही शाळांना केला होता. दोन्ही शाळांनी त्यांची मागणी मान्य करत गणवेशात बदल केला आहे.
या मागणीचा विचार दोन्ही शाळांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून गणवेशात बदल केला आहे. पां.जा.हायस्कुलचे उपप्राचार्य प्रभाकर गोतारणे व स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य सुभाष बनकर या बदलाची माहिती दिली. दरम्यान, मनसेचे तालुका अध्यक्ष कांतीकुमार ठाकरे, मनसे विद्यार्थी सेनेचे तालूका उपाध्यक्ष निखील बागुल, प्रितम पाटील, दिवेश दिनकर, चेतन रोडगे, विक्रांत ठाकरे, जितेश किणी, विजय बोरसे, हेमंत जाधव या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला होता.

Web Title: PJ, Swami Vidyalaya changed uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.