शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या कारचे म्युझिक सिस्टीम; टेप चोरी करणारे सराईत आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 19:34 IST

 महागड्या कारचे म्युझिक सिस्टीम टेप चोरी करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. 

(मंगेश कराळे)

नालासोपारा : गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी महागड्या कारचे म्युझिक सिस्टीम, टेप चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी १५ गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

विरारच्या देवेंद्र खेमराज जैन (४८) यांच्या इनोव्हा कारमधून ३ ते ५ डिसेंबर दरम्यान चोरटयाने त्यांच्या गाडीच्या डाव्या बाजुकडील दरवाज्याची काच तोडुन, नुकसान करुन कारमधील टोयोटो कंपनीचा कारटेप चोरून नेला होता. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील परिसरात गेल्या काही महिन्यांपासुन महागडया कारचे काच फोडुन म्युझिक सिस्टीम/कार टेप चोरीच्या गुन्हयाच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होवून सदर गुन्हे करणारी टोळी अधिक सक्रीय झाली होती. सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच दाखल गुन्हयांचा तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष 3 कडे वर्ग करण्यात आला होता. 

गुन्हयात तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गुप्त बातमीवरुन आरोपीत जुबेर रईस अहमद (३२) आणि शहनवाज मोहम्मंद अलियार खान (१९) या दोघांना ९ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. तर तिसरा आरोपी परवेज इकबाल सैय्यद (३६) याला १२ डिसेंबरला अटक केली आहे. सदर आरोपीतांकडून गुन्हा करण्याकरीता वापरण्यात आलेली दोन कार व चोरी केले २० म्युझिक सिस्टीम, कारटेप असा एकूण १० लाख ३२ हजार १६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी जुबेर रईस अहमद हा कारटेप चोरीचा सराईत आरोपी असुन त्याचेवर कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र मधील विविध ठिकाणी ३५ पेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत. सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) अमोल मांडवे,  यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मुकेश तटकरे, सागर बारवकर, सचिन घेरे, शंकर शिंदे, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे. 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक