केंद्रातील भाजप सरकारला जाग आणण्यासाठी जनतेने 'महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी व्हावे- महाविकास आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 18:52 IST2021-10-09T18:52:28+5:302021-10-09T18:52:41+5:30
शनिवारी या महाराष्ट्र बंदच्या माहीतीसाठी वसईतील महाविकास आघाडी पक्षांतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर घटक पक्षा तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन वसई गावात करण्यात आले होते.

केंद्रातील भाजप सरकारला जाग आणण्यासाठी जनतेने 'महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी व्हावे- महाविकास आघाडी
- आशिष राणे
वसई: उत्तरप्रदेशात लखीमपुर खिरी सारख्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप तथा मोदी सरकारला जाग आणण्यासाठी जनतेने भारत देशा सहित संबंध महाराष्ट्र बंद मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे यासाठी नागरिकांनी सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी देशभरासाहित महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी पक्षातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर सर्व घटक पक्षांतर्फे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी या महाराष्ट्र बंदच्या माहीतीसाठी वसईतील महाविकास आघाडी पक्षांतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर घटक पक्षा तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन वसई गावात करण्यात आले होते. यावेळी माहिती देताना महाविकास आघाडी वसई तर्फे सांगितले की, उत्तर प्रदेशातील लखीमपुर-खिरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकारकडून चिरडुन टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरावरून तीव्र निषेध करण्यात येत आहे.
देशातील शेतकऱ्यांवर भाजपच्या केंद्र सरकारकडून व भाजप शासित राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय व अत्याचार होत आहेत. त्यामुळे या क्रूर अत्याचारी भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने सुरू आहेत. त्याची दखल घेत येत्या सोमवार दि.११ ऑक्टोंबर २०२१ रोजी बंदचे आवाहन केलेले आहे. त्यामुळे या बंद मध्ये वसईकरांनी उस्फुर्त पणे सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडी पक्षाच्या वतीनं करण्यांत आले आहे याप्रसंगी या पत्रकार परिषदेत काँग्रेस चे ओनील अलमेडा तर शिवसेनेचे निलेश तेंडुलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राजाराम मुळीक आदी पक्षाचे पदाधिकारी घटक कार्यकर्ते उपस्थित होते.