शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्ये भूतान, २०१९ मध्ये मालदीव... तिसऱ्या कार्यकाळात 'या' देशापासून सुरू होणार PM मोदींचा विदेश दौरा 
2
खातेवाटप जाहीर होताच मंत्री ॲक्शन मोडमध्ये, आज कोणते मंत्री पदभार स्वीकारणार? पाहा संपूर्ण माहिती...
3
"लाज वाटू दे, तुमच्या आई-बहिणींची अब्रू..."; हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटरला सुनावले
4
खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी"
5
जे.पी. नड्डा मंत्रिपदी, भाजपाचे नवे अध्यक्ष कोण? नाव ठरणार नागपुरातून
6
Success Story: अगणित संपत्तीचे मालक, देतात 'रॉयल' एक्सपिरिअन्स; उभं केलंय १ लाख कोटींचं साम्राज्य
7
Railway Stock Price: अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुन्हा रेल्वे मंत्रालय; RVNL सह 'या' शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल
8
'त्रिदेव' फेम अभिनेत्री सोनम खान तीन दशकानंतर करतेय कमबॅक, या कारणामुळे सोडली होती सिनेइंडस्ट्री
9
Anil Ambaniच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, कर्ज फेडण्यासोबतच आता नव्या बिझनेसची तयारी
10
Share Market Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीत आधी घसरण, मग किरकोळ तेजी; एशियन पेट्स वधारला, PSU शेअर्समध्ये तेजी
11
लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी? प्रतिमा बदलण्यासाठी पक्षाचे प्रयत्न
12
आजचे राशीभविष्य, ११ जून २०२४ : कुटुंबात एकोपा राहील, आर्थिक नियोजन यशस्वी कराल
13
सार्वजनिक आरोग्य विभागाला कागदोपत्रीच पुरविले वाहनचालक; शासनाची फसवणूक, गुन्हा दाखल
14
Mutual Funds किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवता? SEBI ची 'ही' महत्त्वाची अपडेट जाणून घ्या 
15
सोनाक्षीच्या लग्नाबाबत वडिलांनाच माहीत नाही, शत्रुघ्न सिन्हा म्हणाले- "आजकालची मुलं..."
16
इच्छा + स्थिरता = संकल्प, संकल्प + परिश्रम = सिद्धी, पीएमओतील कर्मचाऱ्यांना मोदींचा कानमंत्र
17
‘मुलांना लपविले म्हणून वाचले’, बसवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या पित्याने सांगितला भयावह अनुभव
18
मनमोहन सिंग यांना फोन करुन मोदींनी घेतले आशीर्वाद
19
मुलांना व्यसन लावणाऱ्या पाेस्टवर येणार बंदी, न्यूयाॅर्कमध्ये विधेयकाला मंजुरी, पाेस्ट दाखविण्यासाठी हवी आईवडिलांची संमती
20
भारतात बसून केला विदेशातील मुलीचा छळ, इंटरपोलच्या टीपवरून एकाला अटक

प्रेयसीला भेटण्यास गेलेल्या प्रियकराला चोर समजून संतप्त नागरिकांनी दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 10:46 AM

विरारमध्ये चोर समजून नागरिकांनी एका प्रियकराला बेदम चोप दिल्याची हास्यास्पद घटना फुलपाडा येथील डोंगरी परिसरात घडली आहे.

वसईः विरारमध्ये चोर समजून नागरिकांनी एका प्रियकराला बेदम चोप दिल्याची हास्यास्पद घटना फुलपाडा येथील डोंगरी परिसरात घडली आहे. रविवारी रात्री 12च्या सुमारास याच परिसरात राहणारा एक तरुण मद्यधुंद अवस्थेत आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूने पाईप व ग्रिलवर चढून मोठ्या कसरतीने टेरेसपर्यंत पोहोचला.दरम्यान त्याचवेळी बिल्डिंग परिसरात वावरणाऱ्या काही नागरिकांचे वर चढणाऱ्या या तरुणाकडे लक्ष गेले आणि मागील बऱ्याच दिवसांपासून या परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने हा तरुण चोर असल्याचा संशय नागरिकांना आल्यानंतर त्यांनी मोठमोठ्याने चोर चोर ओरडायला सुरुवात केली. परिणामी आपल्याला चोर समजत असल्याचे या तरुणाला समजताच हा तरुण दचकला व पळ काढू लागला. तो एका बिल्डिंगच्या टेरेसवरून दुसऱ्या बिल्डिंगवर उड्या घेत असल्याने नागरिकांना हा नक्कीच अट्टल चोर असल्याच्या संशयाला दुजोरा मिळाला.अखेर दोनशे ते तीनशेहून अधिक संतप्त नागरिकांनी या प्रियकर चोराला खाली उतरवून बेदम चोप देत आपल्या संतापाची वाट मोकळी केली. नागरिकांच्या मारहाणीत हा तरुण बऱ्यापैकी जखमी असून, प्रेयसीला भेटण्यासाठी केलेली ही कसरत त्याला चांगलीच महागात पडली आहे. एकूणच कालचा गोंधळ बरा होता या युक्तीनुसार या प्रकरणी अद्यापही विरार पोलिसांत या घटनेची तक्रार करण्यात आलेली नाही.