कुडूस येथे खड्ड्यांमुळे पादचाऱ्याचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 05:28 AM2019-10-13T05:28:12+5:302019-10-13T05:28:25+5:30

सात तास रास्ता रोको । भिवंडी-वाडा मार्गावर अपघाताची मालिका सुरूच

Pedestrian victim due to pits at Kudus | कुडूस येथे खड्ड्यांमुळे पादचाऱ्याचा बळी

कुडूस येथे खड्ड्यांमुळे पादचाऱ्याचा बळी

googlenewsNext

वाडा : भिवंडी - वाडा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी रात्री कुडूसजवळील एव्हरशाईन हॉटेलजवळ खड्डा चुकवताना एका टेम्पोने पादचाºयाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. रामप्रसाद गोस्वामी (५६) असे त्याचे नाव आहे. यानंतर शनिवारी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी आक्रमक होत कुडूस नाका येथे सहा ते सात तास महामार्ग रोखून धरला.


आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत रस्त्याचा ठेका असलेली सुप्रीम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा निषेध नोंदवला. हा रास्ता रोको केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शुक्रवारी रात्री कुडूस येथील एव्हरशाईन हॉटेलजवळ एका टेम्पोने खड्डा चुकवताना रामप्रसाद गोस्वामी (५६) या व्यक्तीला धडक दिली. त्यानंतर तत्काळ त्याला उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आक्र मक होत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने कुडूस नाका येथे रास्ता रोको आंदोलन करत सुप्रीम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक करत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा पवित्रा घेतल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. वाड्याचे तहसीलदार उद्धव कदम यांनी या आंदोलनाची दखल घेतली आणि ते आंदोलनस्थळी पोहोचले.

आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर हा रस्ता सरकारने सुप्रीम कंपनीकडून काढून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आल्याचे सांगून रस्ता दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर करण्यात येईल. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनावणे यांनी सुप्रीम कंपनीचे मालक विक्रांत शर्मा, अधिकारी झेड.एन.शेख व चेतन बडगुजर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून एफआयआर करण्यात आल्याचे सांगितल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी कुडूस व्यापारी संघटनेने आंदोलनात सहभागी होत आपला पाठिंबा दर्शविला. च्भिंवडी-वाडा-मनोर हा महामार्ग पूर्णपणे खड्ड्यात गेला असून येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे दररोज अपघात होत असून निष्पाप लोकांचा बळी जात आहे. दोनच दिवसांपूर्वी (९ आॅक्टोबर) या मार्गावरील दुगाडफाटा येथील अपघातात नेहा शेख या डॉक्टर तरूणीचा बळी गेला होता.

Web Title: Pedestrian victim due to pits at Kudus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.