आठ वर्षाच्या कन्येवर बलात्कार करणा-या पित्यास अटक, आईनेच दाखल केली पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:06 IST2018-02-23T02:06:25+5:302018-02-23T02:06:28+5:30

सफाळे जवळील पेनंद येथील ८ वर्षीय आपल्याच मुली बरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणाºया नराधम बापाच्या मुसक्या सफाळे पोलिसांनी आवळल्या असून पालघर न्यायालयाने त्याला दिवसाची

Parent arrested for raping an 8-year-old girl | आठ वर्षाच्या कन्येवर बलात्कार करणा-या पित्यास अटक, आईनेच दाखल केली पोलिसात तक्रार

आठ वर्षाच्या कन्येवर बलात्कार करणा-या पित्यास अटक, आईनेच दाखल केली पोलिसात तक्रार

हितेंन नाईक 
पालघर : सफाळे जवळील पेनंद येथील ८ वर्षीय आपल्याच मुली बरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणाºया नराधम बापाच्या मुसक्या सफाळे पोलिसांनी आवळल्या असून पालघर न्यायालयाने त्याला दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सफाळे (नवघर-पेनंद) जवळील आदिवासी समाजातील एक ४५ वर्षीय इसम आपली पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासोबत रहात होता. पावसाळी शेतीची कामे संपल्यानंतर हाती कुठलाही व्यवसाय नसल्याने त्याला दारूचे व्यसन लागले होते. घराचा चरितार्थ चालावा म्हणून त्याची पत्नी आपल्या परिसरातून पाने, भाजीपाला मुंबई येथे विक्र ी करण्यास जात असे. याचा गैरफायदा घेऊन आरोपी आपल्या मुलीवर अत्याचार करीत होता. याची माहिती कुणाला सांगितल्यास मारहाणीचा धमकी देत असे. त्या भीतीने ती कुणाला काहीही सांगत नव्हती. १६ फेब्रुवारी रोजी आपली पत्नी भाजीपाला विक्री करण्यासाठी मुंबईला गेली असल्याचा फायदा घेत पुन्हा आपल्या मुलीवर तो नराधम अत्याचार करीत असल्याचे त्याच्या मुलांनी पाहिले. त्यांनी शेजारी राहणाºया आपल्या एका महिला नातेवाईकांला सांगितले. तेव्हा तिने येऊन त्या नीच बापाच्या अत्याचारापासून तिची सुटका केली. रात्री आई घरी आल्यानंतर तिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास केळवे सागरी पोलीस स्टेशन च्या सहा.पो.नि.सिद्धवा जायभाये या करीत असून आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती जायभाये यांनी दिली.

Web Title: Parent arrested for raping an 8-year-old girl