पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग सक्तीच्या रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 03:29 IST2020-05-08T03:29:17+5:302020-05-08T03:29:25+5:30
देशमुख यांनी गुरुवारी जिल्ह्यास भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली

पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग सक्तीच्या रजेवर
पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गडचिंचले येथे झालेल्या मॉब लिचिंगप्रकरणी अखेर गृहविभागाने गुरुवारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असून त्यांचा पदभार अतिरिक्त अधीक्षकांकडे सोपविला असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईत केली. गडचिंचले येथे जमावाने चोर समजून तिघांची हत्या केल्याची घटना एप्रिल महिन्यात घडली होती.
त्यानंतर देशमुख यांनी गुरुवारी जिल्ह्यास भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदही घेतली. याप्रकरणाच तपास सीआयडीकडे सोपविला असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षकांकडून स्लॅक सुपर व्हिजन झाल्याची बाब लोकमतने निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर देशमुख यांनी मुंबईत पोहल्यानंतर सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याची घोषणा केली.