शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पालघर पोलिसांना गुन्हे उकलण्यात अपयश! मात्र २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये गुन्हे रोखण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 12:26 AM

पालघर पोलिसांनी २०१८ सालच्या वाढत्या गुन्हेगारीच्या आकड्यांकडे जातीने लक्ष घालून २०१९ वर्षामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश मिळवले आहे

- मंगेश कराळेनालासोपारा : पालघरपोलिसांनी २०१८ सालच्या वाढत्या गुन्हेगारीच्या आकड्यांकडे जातीने लक्ष घालून २०१९ वर्षामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश मिळवले आहे, मात्र दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे.एकीकडे पोलीस गुटखा, दारू, रेती, ड्रग्स माफिया यांच्यावर वचक ठेवत असले तरी जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, दिवसा व रात्री होणाऱ्या घरफोड्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या होणा-या चो-या, बलात्कार, विनयभंग, अपहरण व अपघात अशा गंभीर गुन्ह्यांच्या आकड्यांत मात्र वाढ होत आहे. २०१८ साली गुन्ह्यात वाढ झाली होती, पण उकलही चांगली झाली होती, तर २०१९ साली गुन्ह्यांत घट झाली, पण दाखल गुन्ह्यांची उकल फारशी समाधानकारक झालेली नाही.पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या अंतर्गत असलेले तुळिंज, अर्नाळा, विरार, माणिकपूर आणि वालीव या पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, दिवसा व रात्री होणा-या घरफोड्या, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या होणा-या चो-या, बलात्कार, विनयभंग, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यांची जास्त नोंद झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत.वसई, विरार, पालघर आणि बोईसरमध्ये लोंढेचे लोंढे दररोज येत असल्याने जनसंख्या झपाट्याने या भागातील वस्ती वाढत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या पोलीस यंत्रणा ज्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांचा शोध घेत आहेत, त्यातील अनेक गुन्हेगार पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा, वसई, विरार या परिसरात बिनधास्त आश्रय घेताना आढळून येत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगारांना किंवा मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना लपण्यासाठी नालासोपारा शहरात स्वस्तात घरे भाड्याने उपलब्ध होत असल्याने हे शहर या गुन्हेगारांसाठी सगळ्यात सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.गेल्या काही वर्षांपासून नालासोपारा शहराचे नाव गुन्हेगारी, दहशतवादी, आतंकवादी घडामोडी, नकली नोटा, बांग्लादेशी यांच्याशी जोडले गेलेले आहे. या ना त्या घटनांमुळे नालासोपारा शहराचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. गुन्हेगारांचे माहेरघर म्हणजे नालासोपारा शहर अशी जणू आता नालासोपारा शहराची ओळखचनिर्माण झाली आहे.तीन हजार गाड्यांचा अद्याप शोध नाही२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीत पालघर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांअंतर्गत हजारो वाहने चोरीला गेलेली आहेत. या चोरीला गेलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांपैकी ३००० वाहनांचा शोध लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.

टॅग्स :Policeपोलिसpalgharपालघर