शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आदित्यनाथ योगींची सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 2:10 AM

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहिर सभा विरार येथे घेण्यात आली होती.

वसई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहिर सभा विरार येथे घेण्यात आली होती. भाजपाकडून उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आलेले योगी यावेळी पुन्हा महायुतीचे गावित यांना मत द्या म्हणून मतदारांपुढे मतांचा जोगवा मागणार आहेत. योगींची जाहिर सभा येत्या २२ एप्रिलला नालासोपारा सेंट्रल पार्क येथे घेण्यात येणार आहे.लोकसभा निवडणूकीच्या पाशर््वभूमीवर सेना-भाजपा युती झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा वसईत प्रचारासाठी येत आहेत. त्यांच्या जाहिर सभेत कोणतीही उणीव असता कामा नये म्हणून पदाधिकारी व कार्यकर्ते जोरात कामाला लागले आहेत. या अगोदर योगी १९ एप्रिलला येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता त्यात बदल केला गेला असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी दिली. पालघर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी अवघ्या दहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपा-शिवसेनेचे अनेक मोठे नेते वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात प्रचारासाठी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या जाहिर सभेकडे सध्या वसई-विरारच्या मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.गेल्या लोकसभा पोटनिवडणूकीच्या वेळी शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांची सभा वसईतील वसंत नगरी मैदानावर ज्या दिवशी होती त्याच दिवशी विरार मनवेलपाडा येथे योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजीत करण्यात आली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याच्या दोन दिवस अगोदर नालासोपाऱ्यात गालानगरमध्ये भोजपूरी अभिनेता मनोज तिवारी याला सोबत घेऊन उत्तर भारतीय मतदारांना भाजपाला मतदान करण्यासाठी आवाहन केले होते. या तिन्ही नेत्यांच्या सभा वसई, नालासोपारा व विरार येथे झाल्यानंतरही त्यावेळचा तिस-या स्थानाचा दावेदार पक्ष बहुजन विकास आघाडी पक्षाला फारसा मताधिक्यात फरक पडला नव्हता. मात्र आता स्थिती वेगळी आहे.गेल्या पोटनिवडणुकीत योगींचे तिखट भाषण तर उद्धवांचे प्रत्युत्तरपालघर लोकसभा पोटनिवडणूकिच्या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनाविरोधी तिखट भाषण केले होते.शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी करून,शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा पक्ष राहिला नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. आजची शिवसेनाही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसल्याचा टोलाही त्यांनी लावला होता. अफजल खानबरोबर शिवसेनेची तुलना करायला ते विसरले नव्हते.त्याचवेळी वसईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील सभा सुरू होती. योगी आदित्यनाथ यांनी पायात चप्पल घालून छत्रपती शिवरायांना वंदन केल्याबद्दल त्यांनी जाहिर नाराजी व्यक्त केली होती.महाराष्ट्रात येऊन योगींना विकासाचा उपदेशाचा डोस देण्याची गरज नसून,गोरखपूर येथील रूग्णालयात मृत्यू पावलेल्या बालकांबद्दल ते काही करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली होती.फक्त निवडणूक काळात ते भारतात राहात असल्याचा टोला त्यांनी लावला होता.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर