पालघर आगाराला बाप्पा पावला :  ४३ लाख उत्पन्न, २४५ विशेष बसेस सोडण्याचा प्रयत्न यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 05:42 AM2017-09-14T05:42:33+5:302017-09-14T05:42:58+5:30

यंदा कोकणात गौरी-गणपतीच्या सणासाठी जाणाºया चाकरमान्यांसाठी २४५ विशेष बसेस सोडण्याच्या उपक्रमातून राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाला ४३ लाख ५१ हजार ५७६ रु पयांचे जादा उत्पन्न मिळाले.

 Palghar got Bappa to Agar: Success of releasing 43 lakhs and 245 special buses succeeded | पालघर आगाराला बाप्पा पावला :  ४३ लाख उत्पन्न, २४५ विशेष बसेस सोडण्याचा प्रयत्न यशस्वी

पालघर आगाराला बाप्पा पावला :  ४३ लाख उत्पन्न, २४५ विशेष बसेस सोडण्याचा प्रयत्न यशस्वी

Next

- हितेंन नाईक 
पालघर : यंदा कोकणात गौरी-गणपतीच्या सणासाठी जाणाºया चाकरमान्यांसाठी २४५ विशेष बसेस सोडण्याच्या उपक्रमातून राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाला ४३ लाख ५१ हजार ५७६ रु पयांचे जादा उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे कुठलाही अपघात व प्रवाशांची गैरसोय न होता हा उपक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यात एसटी विभाग यशस्वी झाला.
पालघर विभागाने जिल्ह्यातून कोकणात जाणा-या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीची चोख व्यवस्था केली होती. सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाºया एसटीने आपली ओळख व प्रवाश्याशी असलेले नाते अधिक दृढ करतांना या नियोजनाला कुठेही गालबोट लागणार नाही याची अधिक दक्षता घेतली. या विभागाचे प्रमुख अजित गायकवाड व त्यांच्या सहका-यांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आणि उत्साहवर्धक वातावरणात पालघर, डहाणू, वसई, जव्हार डेपोतून सोडलेल्या २४५ बसेस द्वारे १ लाख ४३ हजार १६९ किलोमीटरचा प्रवास सुखरुप पार पाडण्याची विशेष दक्षता घेतली. व ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ध्येयवाक्य कृतीत उतरविले.

अशी बजावली आगारनिहाय कामगिरी

ंचाकरमान्यांनी केलेल्या मागणी नुसार २१ आॅगस्ट पासूनच अर्नाळा आजारातून पहिली एसटी कोकणा कडे रवाना करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. पालघर आगारातून २३ एसटींनी १६ हजार ४६ किमीचा प्रवास करून ४ लाख ६० हजार ४३७ रु पये, सफाळे आगारातून ६ बसेस द्वारे ४ हजार ६३१ किमी प्रवासातून १ लाख ५ हजार ५६९ रु पये, वसई आगारातून ३९ बसेस द्वारे २७ हजार २३३ किमी प्रवासातून ७ लाख ८३ हजार ३ रुपये,अर्नाळा आगारातून ८८ बसेस द्वारे ३५ हजार १४९ किमी प्रवासातून सर्वाधिक ८ लाख ७८ हजार ६७८ रुपये, नालासोपारा आगारातून २७ बसेस द्वारे १४ हजार ४१८ किमी प्रवासातून ४ लाख ८२ हजार ९२३ रु पये,डहाणू आगारातून १४ बसेस द्वारे १३ हजार ४२ किमी च्या प्रवासातून 2 लाख ९९ हजार ७८१ रु पये,जव्हार आगारातून २२ बसेस च्या फेºया द्वारे १६ हजार ३७२ किमी प्रवासातून ६ लाख ३० हजार ७०१ रुपये तर बोईसर आगारातून २६ बसेस फेºया द्वारे १६ हजार २७९ किमी प्रवासातून ६ लाख १० हजार ४८४ रु पये अश्या एकूण २४५ बस फेºया द्वारे १ लाख ४३ हजार १६९ किलोमीटरचा प्रवास निर्विघनपणे पार पाडीत राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाने एकूण ४३ लाख ५१ हजार ५७६ हजाराचे उत्पन्नाचे उिद्दष्ट (६४.८९ टक्के भारमान) निर्विघ्नपणे पार केल्याची माहिती सहाय्यक वाहतूक अधीक्षक अंकुश सागर ह्यांनी लोकमत ला दिली.

Web Title:  Palghar got Bappa to Agar: Success of releasing 43 lakhs and 245 special buses succeeded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार