पालघर: डंपर एसटी बसचा अपघात! दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू; २० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 14:36 IST2023-12-30T14:33:49+5:302023-12-30T14:36:47+5:30
जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पालघर: डंपर एसटी बसचा अपघात! दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू; २० जण जखमी
हितेन नाईक
पालघर- पालघरमध्ये आज दुपारी एसटी बस आणि डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका दीड वर्षाचा बालकाचा मृत्यू झाला. तर २० जण जखमी आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मिळालेली माहिती अशी, शिर्डी ही बस विक्रमगडच्या दिशेने जात असताना बोरांडा येथे एका डंपरने धडक दिली. या अपघातातील जखमींना उपचारासाठी मनोर च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार राजेंद्र गावित तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी जखमींना उपचारासाठी दाखल करण्यासाठी स्वतः घेतला पुढाकार घेतला. दरम्यान पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.