शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पालघर जिल्ह्यात सर्वत्र संततधार! अनेक ठिकाणी साचले पाणी, चाकरमान्यांची रखडपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 00:32 IST

पालघर जिल्ह्यात पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने एकीकडे शेतकरी वर्ग सुखावला गेला असतांना दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या डहाणू-पालघर दरम्यानच्या मुंबईकडे (अप) जाणाऱ्या ट्रॅकमध्ये पाणी साचल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन गाड्या उशिराने धावत होत्या.

- हितेंन नाईकपालघर - जिल्ह्यात पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने एकीकडे शेतकरी वर्ग सुखावला गेला असतांना दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या डहाणू-पालघर दरम्यानच्या मुंबईकडे (अप) जाणाऱ्या ट्रॅकमध्ये पाणी साचल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन गाड्या उशिराने धावत होत्या. तर अनेक भागातील विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित होण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र आज कुठेही जीवित वा वित्तहानीची घटना घडली नसल्याचे  प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने निर्माण होणाºया पाणी टंचाईच्या विचाराने जिल्हा प्रशासन धास्तावले होते. आकाशात जमणारे काळे ढग पाऊस न पाडताच पुढे निघून जात असल्याने आपल्या शेतात पेरणी केलेला शेतकरी चिंताग्रस्त बनला होता. जिल्ह्यात एकूण भात लागवडीचे ७७ हजार ३०० हेक्टर क्षेत्र असून ६० टक्के क्षेत्रात पेरणीचे तर २० हजार हेक्टर क्षेत्रात नागली व वरई लागवडीचे काम पूर्ण झाल्याचे जिल्हा कृषी अधिकारी तरकसे ह्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे.पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते पालघर दरम्यानच्या स्थानकातील रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचून राहिल्याने दुपारी ११.३० ते १ वाजे दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन राजधानी एक्सप्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत होत्या. पालघर स्थानकातील पोल क्र मांक १३ ते १७ या दरम्यान जास्त प्रमाणात पाणी साचल्याने अनेक कर्मचाºयांनी धाव घेत हे साचलेले पाणी दूर केल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाली.पालघर नगरपरिषद क्षेत्रात माहीम रोड, टेंभोडे रोड, जुना पालघर भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अनेक वाहन चालकांचा अंदाज चुकल्याने गाड्या गटारीच्या चेंबरमध्ये अडकल्या तर शहरातील सर्व पाणी पानेरी नदीद्वारे समुद्राला मिळत असल्याने पानेरी नदीच्या होणाºया प्रदूषणाला नगरपरिषदेला जबाबदार धरीत पाणेरी बचाव संघर्ष समितीने नगरपरिषदेचे दूषित पाण्याचे स्त्रोत भराव टाकून अडवून ठेवले आहे. त्यामुळे आज अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. पहाटेपासून धुवाँधार सुरू असणाºया पावसाने दुपारी काही काळासाठी उसंत घेतली असली तरी ४.३० वाजल्यानंतर पावसाने मोठा जोर धरल्याने पाणी साचण्याच्या प्रकारात वाढ झाल्यास वित्तहानीच्या घटना घडू शकतात. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असून कुठेही जीवित वा वित्तहानीच्या घटना घडल्या नाहीत.वसईत जोरदार हजेरी, मार्ग जलमय, नागरिकांची तारांबळपारोळ- वसईत उशिराने आलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारीही कोसळधार सुरूच होती. मार्गालगत बांधकामे करून पाण्याची वाट बंद केल्याने पहिल्या पावसातच शिरासाड अंबाडी, विरारफाटा विरार, सोपारा फाटा ते नालासोपारा या मार्गावर पाणी आले यामुळे या मार्गावरील वाहतूक मंद गतीने सुरू होती. तर अचानक आलेल्या पावसाने नोकरदार वर्गाची मोठी तारांबळ उडाली तर बळीराजावर पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट असताना या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे.वसईत ७ जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, या वेळी २७ जूनपर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले होते. मान्सूनपूर्व बरसलेल्या पावसानंतर शेतामध्ये राब टाकण्यात आला होता; परंतु पावसाने पाठ फिरवल्याने राब करपण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी बळीराजा सुखावला आहे. पाऊस बरसल्याने दुबार पेरणीचे संकट आता टळले आहे. यामुळे शेतकºयांची चिंता दूर झाली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.तालुक्यातील भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पहाटेपासूनच पावसाची रिपरिप ही सुरू आहे. यामुळे नोकरीला जाणाºयांची व शाळकरी मुलांची तारांबळ उडाली, तर दुसरीकडे आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी सुखावला आहे. तर उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र, नंतरच्या काळात गेले काही दिवस पाऊस दडी मारून बसला होता. पावसाने पाठ फिरवल्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडले होते. दरम्यान, गुरुवारी, शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे थोडा का होईना पण शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. वसई, विरार, नालासोपारा, परिसरातील सखोल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. नाले, गटारे तुडुंब भरून वाहत होती. त्यामुळे नालेसफाईचा दावा फोल ठरला. 

टॅग्स :palgharपालघरRainपाऊस