Palghar Bypoll 2018 : दीड हजार कर्मचारी बॅक टू होम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:19 IST2018-05-29T00:19:39+5:302018-05-29T00:19:39+5:30
पालघर लोकसभा पोट निवडणूकीच्या मतदान केंद्रावर नेमणुकीसाठी प्रशिक्षण दिलेल्या १५ हजार ७०० कर्मचाऱ्यांपैकी सहा विधानसभा मतदार संघातील

Palghar Bypoll 2018 : दीड हजार कर्मचारी बॅक टू होम
पालघर : पालघर लोकसभा पोट निवडणूकीच्या मतदान केंद्रावर नेमणुकीसाठी प्रशिक्षण दिलेल्या १५ हजार ७०० कर्मचाऱ्यांपैकी सहा विधानसभा मतदार संघातील जवळपास दीड हजार कर्मचाºयांना काही काम उरले नसल्याने विना मानधन घरी पाठविल्याने त्यानी तेथील जागेवरच आंदोलन सुरु केले होते.
पालघर लोकसभा पोट निवडणूकीच्या २ हजार ९७ मतदान केंद्रावर काम करण्यासाठी एकूण १५ हजार ६२२ कर्मचाºयांना २३ आणि २७ तारखेला प्रशिक्षण देण्यात आले. एआरओ तथा पालघर जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकाºयांनी अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाºयांंना अचानक निघून जाण्याचा व उद्याही निवडणूक कामी न येण्याचा तोंडी आदेश दिला. महिनाभर या प्रक्रि येत अडकून ठेवून त्यांच्या मे महिन्याच्या कौटुंबिक सुट्टी कार्यक्र माची ही वाट लावल्यानंतर आता मात्र, त्यांच्या निवडणूक कामाच्या मानधना बाबत नेहमी प्रमाणे काहीही समाधानकारक उत्तर न देता आचानक निघून जाण्यास सांगितले. यामुळे गोंधळाचे व संभ्रमित वातावरण झाले असून हे दिड हजार कर्मचारी निर्णायक न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. आपल्या कुटुंबिया बरोबर फिरायला गेलेल्या, कामानिमित्त बाहेर गेलेल्यांना निवडणुकीच्या कामासाठी व प्रशिक्षणा करीता सर्वोच्च न्यायालयाची भीती दाखवून माघारी बोलाविण्यात आले. या कर्मचार्याच्या म्हणण्या नुसार दादागिरी, निवडणुकीचे कारण दाखवून प्रत्येक निवडणूकीत नियोजनाविना शिक्षकांना दमदाटी करून काम लादले जाते, अनेकांना राखीव म्हणून बसवून ठेवले जाते व मानधनाशिवाय परत पाठवण्याचे प्रकार प्रत्येक निवडणुकीत घडतात. शिक्षकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असल्याचे एक शिक्षिकेने आपले नाव न छापण्याच्या अटीवर लोकमत ला सांगितले.