शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

मालमत्ताकराची 11 कोटींपैकी केवळ चार कोटी रक्कम जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 12:36 AM

पालघर नगर परिषद वसुलीत अपयशी : जप्तीची होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : सन २०१९-२० सालच्या सुमारे ११ कोटींच्या मालमत्ता कर वसुलीपैकी अवघी चार कोटीची रक्कम वसूल करण्यात पालघर नगर परिषद प्रशासनाला यश आले आहे. उर्वरित सात कोटींच्या रकमेची वसुली करण्यात नगर परिषदेला अपयश येत असल्याने त्यांनी आता नोटीस, जप्ती आणि वेळ पडल्यास गुन्हे दाखल करण्याची पावलेही उचलली जातील, असा कडक इशारा मुख्याधिकारी स्वाती देशपांडे-कुलकर्णी यांनी दिला आहे.

पालघर नगर परिषद हद्दीमध्ये ३२ हजार ५७१ मालमत्ताधारक असून, त्यापैकी २६ हजार ८४ निवासी, ६ हजार ९१ वाणिज्य, ३६७ औद्योगिक, २७ धार्मिक, तर दोन सरकारी व्यवस्थापना आहेत. मागील अनेक वर्षांपासूनची असलेली थकबाकी आणि सन २०२०-२१ वर्षाचा असा एकूण सात कोटींहून अधिक थकबाकी वसुलीसाठी महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली एकूण चार पथके कार्यरत करण्यात आली असून,  ही पथके थकबाकीधारकांचे उंबरठे झिजवत आहेत. दुसरीकडे शहरात लाउडस्पीकरवरून थकबाकीचा भरणा आणि जप्तीबाबत नागरिकांना आवाहनही केले जात आहे. थकबाकीदारांमध्ये दहा हजार रुपयांहून अधिक रक्कम थकीत असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या ६५० इतकी असून, ५० हजार ते १ लाखदरम्यान रुपयांची थकबाकी असलेले १४७ मालमत्ताधारक आहेत. १ लाख रुपयांहून अधिक थकबाकी असणारे ६५ मालमत्ताधारक असून, कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेकांच्या व्यवसाय व नोकरीवर गदा आल्याने मालमत्ता कर एकत्रित भरणे शक्य नसल्यास त्यांना हप्त्यांची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा देताना मालमत्ताधारकांनी दिलेले धनादेश मुदतीत न वटल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

कर देण्यास अनेकांची टाळाटाळमालमत्ताधारकाकडून मालमत्ता कराची रक्कम अदा करण्यास टाळाटाळ करण्यात येत असेल किंवा देय रक्कम भरली जात नसेल अशांच्या विरोधात नगर परिषद अधिनियमानुसार जप्ती करण्याबाबत पूर्वसूचना, नोटीस बजावण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे मुख्याधिकारी स्वाती देशपांडे-कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार