‘आपले सरकार’ पोर्टेलचे तहसीलमध्ये प्रेझेंटेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:14 IST2018-08-22T23:14:08+5:302018-08-22T23:14:28+5:30
ऑफलाईन दाखले बंद झाल्याने ग्रामस्थ आनंदात

‘आपले सरकार’ पोर्टेलचे तहसीलमध्ये प्रेझेंटेशन
विक्रमगड : गेल्या अनेक वर्षापासून तहसील कार्यालयातील उत्पन्न दाखले, अधिवास दाखल भुमीहीन दाखल, नॉनक्रिमेलीअर दाखला, रहिवाशी दाखला, शेतमजूर दाखला, अशा प्रकारची जवळजवळ, २० ते २५ दाखले आॅफ लाईन दिली जात होती परतू विक्रमगड येथील तहसीलदार श्रीधर गालेपिल्ली यांनी आपले सरकार या पोर्टलचा वापर सुरू करून हे सर्व दाखले आॅनलाईन करण्यात आले आहे .
या आॅनलाईन दाखल्यामुळे वेळ वाचतो, तसेच हे दाखले कधीही सही करून आॅनलाईन टाकू शकतो त्यामुळे सुटटी असो वा नसो हे दाखले महा सेवेतून तुम्हाला लगेच मिळू शकतात. व हे दाखले मिळ्ल्यानंतर ते कोणत्याही विभागातून काढू शकतात कारण आपले नाव सेव झाल्याने पुन्हा काढण्यासाठी परत कागदपत्रांची गरज नसते अशी माहिती तहसीलदार यांनी दिली. तसेच तालुक्यातील घडलेल्या तहसील विभागाची माहिती ही कार्यालयातील प्रोजेक्टर द्धारे ती दाखवली जाईल यासाठी कार्यालयात प्रोजेक्टर लावण्यात आला आहे व माहिती हि संग्रहित राहणार आहे.