लोकमत न्यूज नेटवर्क मिरा रोड : मिरा - भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उत्तन प्रचार सभेत मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांना मंत्री नितेश राणे यांनी व्यासपीठावर बसवल्याने वाद निर्माण झाला आहे. मंत्रिपदाचा दुरुपयोग व आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आता सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. तुम्ही जर आम्हाला मतदान केले, तरच तुमचे प्रश्न सोडवू. पण, मतदान जर दुसरीकडे केले, तर माझा स्वभाव दुसऱ्यासारखा नाही, अशी धमकीवजा समजदेखील मंत्री राणे यांनी यावेळी दिली.
भाईंदरच्या उत्तन येथे मंगळवारी रात्री मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची सभा झाली. मी मंत्री असून, प्रश्न सोडवण्याचे मला अधिकार दिले आहेत. जेटी, मासळी बाजार बनवण्याचे अधिकार माझ्याकडे आहेत. एलईडीवर कारवाई होते, तशी पारंपरिक मच्छीमारांवर कारवाई व्हावी, असे वाटत नसेल तर ते अधिकारही माझ्याकडे आहेत. बंधारा कुठे हवा सांगा, कुठे नको सांगा, तो तुमच्यासमोर दिसणार नाही. ते बंद करण्याचे अधिकारसुद्धा माझ्याकडेच आहेत, असेही राणे म्हणाले.
आमच्याकडेच प्रश्न सोडवायचे व्हॅक्सिनमत्स्य खात्याचे सहायक आयुक्त पाटील यांना स्टेजवर मुद्दाम बसवलेले आहे. मंत्री काय बोलतात आणि उद्यापासून कसे वागायचे, हे सर्वांना समजले पाहिजे. यासाठीच त्यांना व्यासपीठावर बसवले आहे, असे मंत्री राणे म्हणाले. येणाऱ्या वर्षात २६ नवीन योजना मच्छीमारांसाठी आणल्या जाणार आहेत. मच्छीमारांवर अन्याय होऊ देणार नाही. आमच्याकडेच प्रश्न सोडवायचे व्हॅक्सिन आहे. बाकी सर्व फुसफुस करत बसतील. आचारसंहिता संपताच मासळी बाजाराचे भूमिपूजन करू, असे मंत्री राणे म्हणाले. यावेळी आमदार नरेंद्र मेहता, हेरल बोर्जिस आदी उपस्थित होते.
Web Summary : Minister Nitesh Rane threatened voters at a Mira-Bhayandar election rally. He implied development depended on votes for his party, sparking outrage and accusations of violating election conduct rules by having a fisheries officer on stage.
Web Summary : मंत्री नितेश राणे ने मीरा-भायंदर चुनाव रैली में मतदाताओं को धमकी दी। उन्होंने संकेत दिया कि विकास उनकी पार्टी के लिए वोटों पर निर्भर करता है, जिससे आक्रोश फैल गया और एक मत्स्य अधिकारी को मंच पर रखकर चुनाव आचरण नियमों का उल्लंघन करने का आरोप लगाया गया।