शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

१२२ करोड घोटाळ्यातील एकमेव कंत्राटदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:27 PM

‘ते’ २४ जण मोकाट; तपास अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ?

नालासोपारा : सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरारच्या सभेत मनपाच्या १२२ कोटीचा भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करणार असल्याचा सज्जड दम दिल्यानंतर मनपाने आणि विरार पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून २५ पैकी एका कंत्राटदाराला मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, इतर २४ कंत्राटदारावर अद्याप कोणती कारवाई केलेली नाही.मनपामध्ये १२२ कोटीचा घोटाळा झाल्या प्रकरणी २५ ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात २ मार्च २०१९ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, गुन्हा दाखल होऊन ५२ दिवस झाले तरी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी तपास सुरू आहे असे सांगून कारवाई करत असल्याच सरकारी उत्तर लोकमतला दिले. मनोज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा घोटाळा चर्चेत आला. युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारसभेकरिता सोमवारी सोमवारी मुख्यमंत्र्यांंनी एसआयटी चौकशी करण्याचे सांगितल्यावर आकाश इंटरप्रायजेसचे विलास चव्हाण यांना अटक केले करण्यात आली. मात्र, बाकीचे राजकीय वरदहस्त लाभलेले २४ कंत्राटदार अजुनही मोकाट आहेत. सदर गुन्ह्याचा उलगडा करून खरोखरच कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी हा गुन्हा विरार पोलिसांकडून काढून पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत फोनवरून पो. नि. विवेक सोनावणे यांना विचारणा केले त्यांनी टाळाटाळ केली.गुन्हे दाखल झालेले २५ घोटाळेबाजदिव्या इंटरप्राइजेस (कमलेश ठाकुर), वेदांत इंटरप्राइजेस (समीर विजय सातघरे), मधुरा इंटरप्राइजेस (समीर सातघरे), गजानन इंटरप्राइजेस (अर्चना पाटिल), संखे सिक्युरिटी सिर्व्हिस (दिनेश भास्कर संखे), श्रीजी इंटरप्राइजेस (योगेश घरत), ओम साई इंटरप्राइजेस (विनोद पाटील), बालाजी सिर्वस (मंगरूळे बी. दिगंबरराव), वरद इंटरप्रायजेस (सुरेंद्र बी. भंडारे), वरद इंजिनिअरिंग (अभिजित गव्हाणकर), स्वागत लेबर कॉन्ट्रक्टर (नंदन जयराम संखे), क्लासिक इंटरप्राइजेस (दिनेश पाटील), द हिंद इलेक्तिट्रकल एंड इंजीनियर (किशोर नाईक), सिद्धी विनायक इंटरप्राइजेस (नितिन शेट्टी), अथर्व इंटरप्राइजेस, सद्गुरु ट्रेडिंग कंपनी (जिग्नेश देसाई), शिवम इंटरप्रायजेस (तबस्सुम ए.मेमन), रिलाएबल एजन्सी ( झकीर के. मेमन), चिराग लेबर कॉन्ट्रक्टर (राजाराम एस गुटूकडे), आकाश इंटरप्रायजेस (विलास चव्हाण), युनिव्हर्सल इंटरप्रायजेस (सुबोध देवरु खकर), बी एल होणेंस्ट सिक्युरिटी (सुरेंद्र भंडारे), जीवदानी फायर सर्व्हिसेस (किशोर पाटील), आरती सुनील वाडकर आण िश्री अनंत इंटरप्रायजेस (रवी चव्हाण)नेमके काय होते प्रकरण :वसई विरार मनपाच्या ३१६५ ठेका कर्मचाºयांचा पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता या ठेकेदारांनी हडप केला आहे. या घोटाळ्यात २९ कोटी ५० लाख रुपयेचा शासकीय महसूलचाही समावेश असून ९२ करोड ५० लाख रु पये कर्मचाºयांच्या पगाराचे आहेत.अटक केली की नाही मी सांगू शकत नाही. तसे सांगितले तर बाकीचे पळून जातील.- विवेक सोनावणे (पो.नि., विरार)नेमके प्रकरण काय आहे तसेच, ते का असे बोलले याचा मी तपास करतो. - विजयकांत सागर(अप्पर पोलीस अधीक्षक, वसई)

टॅग्स :Arrestअटक