कार-टेम्पोच्या अपघातात एक ठार, १० जखमी: खड्डेमय रस्त्यामुळे ताबा सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:59 IST2017-11-18T00:58:50+5:302017-11-18T00:59:07+5:30
मनोर वाडा रस्त्यावर ताबा सुटल्याने मोटर कार व टेम्पोची समोरा समोर टक्कर झाल्याने कार चालक जागीच ठार झाला तर टेम्पो पलटल्याने त्यातील आठ प्रवाशी व चालक जखमी झाले.

कार-टेम्पोच्या अपघातात एक ठार, १० जखमी: खड्डेमय रस्त्यामुळे ताबा सुटला
मनोर : मनोर वाडा रस्त्यावर ताबा सुटल्याने मोटर कार व टेम्पोची समोरा समोर टक्कर झाल्याने कार चालक जागीच ठार झाला तर टेम्पो पलटल्याने त्यातील आठ प्रवाशी व चालक जखमी झाले. या रस्त्यावर या पुर्वीही अनेक अपघात झाले असून भरधाव वेग व खड्डेमय रस्त्यामुळे चालकांचा वाहनावर ताबा राहत नसणे हे अपघाताचे कारण बनले आहे.
मनोर वाडा रस्त्यावर टेन गावाजवळ झालेल्या या अपघातातमध्ये टेम्पो वाड्याच्या दिशेने जात होता. त्यातच रस्ता अरुंद असल्याने चालकाचा ताबा सुटल्याने समोरुन येणाºया कारवर तो धडकून तो पलटी झाला. धडक एवढी जोरात होती की, कारचे चालक विजय श्रीवास्तव (४२) जागीच ठार झाले. तर सोबत असणाºया सहकारी गंभीर जखमी असून टेम्पो चालकासह आठ प्रवाशी किरकोळ जखमी आहेत. सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय मनोर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी मनोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.