चिमुरडीसोबत चाळे करणाऱ्या रक्षकाची नग्न धिंड, बेदम चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 00:59 IST2019-07-16T00:59:08+5:302019-07-16T00:59:14+5:30

शिकवणीवरून घरी परतणा-या ६ वर्षीय चिमुरड्या बालिकेचा पाठलाग करून इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने तिच्याशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना शनिवारी संध्याकाळी घडली.

The nude shield of a guard with a little girl, a breathtaking ass | चिमुरडीसोबत चाळे करणाऱ्या रक्षकाची नग्न धिंड, बेदम चोप

चिमुरडीसोबत चाळे करणाऱ्या रक्षकाची नग्न धिंड, बेदम चोप

नालासोपारा : शिकवणीवरून घरी परतणा-या ६ वर्षीय चिमुरड्या बालिकेचा पाठलाग करून इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने तिच्याशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना शनिवारी संध्याकाळी घडली. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याची रस्त्यावरून अर्धनग्न धिंड काढून चोप देत अर्नाळा सागरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे.
विरार पश्चिमेकडील बोळींज परिसरात राहणारी ६ वर्षीय अल्पवयीन मुलगी शनिवारी शिकवणीसाठी गेली होती. ती संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास परतत असतांना इमारतीचाच आरोपी सुरक्षा रक्षक साहेब वैद्यनाथ सहानी (२२) याने तिचा पाठलाग करून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. घरच्यांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला. परिसरातील स्थानिकांना ही माहिती कळताच एका महिन्यांपूर्वी कामाला लागलेल्या सुरक्षा रक्षक सहानी याची रस्त्यावरून अर्धनग्न धिंड काढून त्याला बेदम चोप दिला आहे. त्यात महिला वर्ग आघाडीवर होता.त्यांनी चपलेने त्याला चांगलाच बडविला.

Web Title: The nude shield of a guard with a little girl, a breathtaking ass