नाताळखरेदीवर नोटाबंदीचा परिणाम
By Admin | Updated: December 24, 2016 02:56 IST2016-12-24T02:56:00+5:302016-12-24T02:56:00+5:30
या भागात ख्रिस्ती जनसमुदाय राहत असल्याने वसई त नाताळाच्या काळात दुसऱ्या दिवाळीचे वातावरण पाहायला मिळते.

नाताळखरेदीवर नोटाबंदीचा परिणाम
पारोळ (ता. वसई) : या भागात ख्रिस्ती जनसमुदाय राहत असल्याने वसई त नाताळाच्या काळात दुसऱ्या दिवाळीचे वातावरण पाहायला मिळते. मात्र, या वर्षी नोटबंदीचे सावट असल्याने ग्राहक खरेदीमध्ये काटकसर करीत आहेत. तर क्रेडिटवर भरलेल्या मालाची विक्री न झाल्यास करायचे काय हा प्रश्न व्यापाऱ्यांपुढे उभा राहिला आहे. दरम्यान, या वर्षी केकचे भाव १० टक्कयाने वाढले असून या वर्षी नोटबंदी मुळे केक खरेदीत घट झाली असल्याचे व्यापारी जॉन मेंडिस यांनी सांगितले. तर आम्ही काटकसर करीत असलो तरी सणाचा उत्साह कायम असल्याचे चार्ली रोझारिओ यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)