शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

लाच घेणाऱ्यांची खुर्ची कायम, निलंबनाचा मुहूर्त सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 09:47 IST

लाचलुचपत विभागाचे चार वर्षांत २० सापळे : ३७ आरोपी जाळ्यात 

मंगेश कराळेनालासोपारा : ज्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले त्यांना शिक्षा होते, असा समज तुम्ही करून घेतला असेल तर तो चुकीचा आहे. ठाणे व पालघर लाचलुचपत विभागाने २०१८  ते २०२१ यादरम्यान २० सापळे रचून ३७ आरोपींना जाळ्यात पकडले. यातील काही जणांना शिक्षा झाली तर काही निर्दोष सुटले व काही जणांचे खटले अद्यापही प्रलंबित आहेत.लाचखोरांना न्यायालयाने दोषमुक्त केल्याने ते सरकारी सेवेत उजळमाथ्याने वावरत आहेत. तर ज्या लाचखोरांवरील खटले प्रलंबित आहेत, ते सातव्या वेतनाचे लाभ घेत आहेत. पोलिसांकडून पुरेसा पाठपुरावाच होत नसल्याने हे खटले रेंगाळलेले आहेत. त्यामुळे लाच घेताना पकडले, की सहा महिने निम्मा व त्यानंतर पूर्ण पगारासह मजेत नोकरी करा, अशी परिस्थिती आहे. कायदा व शासकीय सेवा नियमन कायद्यान्वये कोर्टात तारीख पे तारीख अन् कर्मचारी पुन्हा लाच घ्यायला मोकळे, अशी परिस्थिती आहे.लाचखोरीत महानगरपालिका नंबर वन 

  • लाचलुचपत प्रतिबंध विभागाची सर्वात जास्त कारवाई वसई-विरार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागासह अन्य विभागात केली आहे. 
  • अतिक्रमण विभागाचे ५ तर ३ लिपिक असे आठ जणांसह १ नगररचना विभागाचा तत्कालीन नगररचना अधिकारी, १ नगररचना लिपिक, १ अग्निशामक अधिकारी असे ११ आरोपींवर केली आहे.
  • महावितरणच्या दोघांवर तर ९ लाचखोर पोलिसांना पकडले आहे. वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला पळून जात असताना एसीबीने पकडल्यावर ते प्रकरणही चांगलेच गाजले. 

चार वर्षांची एकूण आकडेवारी१३ मनपा, ९ पोलीस, २ महावितरण, २ वनविभाग, २ महसूल, खासगी इसम, १ विस्तार अधिकारी, १ ग्रामसेवक, २ मुख्याध्यापक, २ वैद्यकीय विभाग, १ राज्य कर अधिकारी, १ अंगणवाडी सेविका, १ कनिष्ठ लिपिक

सरकारी कर्मचाऱ्याने कोणत्याही कामासाठी लाच घेऊ किंवा मागू नये. लाचेची कोणी मागणी करत असेल तर पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. त्याची पडताळणी करूनच संबंधित सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल. दरवर्षी याकरिता विभागाकडून जनजागृती करण्यात येते. घोटाळा, भ्रष्टाचार होत असल्यास जागरूक नागरिकांनी तक्रार करण्यास पुढे येणे गरजेचे आहे. नवनाथ जगताप, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर

कोणी लाच मागितली तर साधा संपर्कभ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधा. ई मेल dypacbpalghar@gmail.com, टोल फ्री नंबर - १०६४, दूरध्वनी क्रमांक - ०२५२५-२९७२९७ आणि व्हॉट्सअप क्रमांक - ९९२३३४६८१०, ८००७२९०९४४

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणVasai Virarवसई विरार