‘एकही विद्यार्थी शालाबाह्य राहू नये’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:23 IST2018-02-21T00:23:21+5:302018-02-21T00:23:23+5:30
एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये या करता शिक्षक व या समितीने लक्ष द्यावे असे आवाहन समारोपाच्या भाषणात शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी केले.

‘एकही विद्यार्थी शालाबाह्य राहू नये’
बोर्डी : एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये या करता शिक्षक व या समितीने लक्ष द्यावे असे आवाहन समारोपाच्या भाषणात शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी केले. त्या शालेय व्यवस्थापन समितीच्या विभागीय मेळाव्यात बोलत होत्या.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण विकास संस्था आणि डहाणू पंचायत समितीच्या शिक्षण विभागा तर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तो बुधवारी वडकती शाळेच्या पटांगणावर पार पडला. या वेळी डहाणू पंचायत समितीचे सभापती राम ठाकरे, समाजसेवक महादेव सावे यांनी मार्गदर्शन केले. ‘आमची शाळा व आम्ही’ या चर्चा सत्राचेही आयोजन केले होते. शिवाय शाळा उभारणी करताना घेतलेल्या कठोर मेहनतीची माहिती विविध गावातून आलेल्या मान्यवरांनी उपस्थितांना दिली.