शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांचा अर्ज दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 00:34 IST

विक्रमगड विधानसभेत राष्ट्रवादीच्या सुनिल भुसारा यांनी शेवटच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

जव्हार : विक्र मगड विधानसभेत राष्ट्रवादीच्या सुनिल भुसारा यांनी शेवटच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बविआ, सीपीएम आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर लागलीच त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या हेमंत सवरा यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.दरम्यान, भाजपचे विक्रमगड विधानसभेतील नेते हरीश्चंद्र भोये, माजी जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले आणि मधुकर खुताडे यांनीही एकत्रित रॅली काढत आपले अपक्ष अर्ज दाखल केले. यामुळे भाजपला पहिल्याच दिवशी मोठा हादरा बसला आहे. पक्षाने स्थानिक आदिवासींवर अन्याय केला असून या घराणेशाहीला आम्ही विरोध करीत असल्याचे सांगत सवरा यांना खुले आव्हान दिल्याने आता विक्र मगड विधानसभा निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी चांगलेच शक्तीप्रदर्शन केले. यावेळी महाआघाडीच्या सुनील भुसारा यांनी पारंपारिक पद्धतीच्या आदिवासी नृत्यासोबत रॅली काढली. भाजप - सेना युतीचे हेमंत सवरा यांनी जव्हार स्टेडीयम येथून रॅली काढून अर्ज दाखल केला. यावेळी विवेक पंडित, सुरेश जाधव, बाबजी काठोळे आदि उपस्थित होते. या रॅलीत भाजप कार्यकर्ते दुभंगलेले दिसून आले. कारण सवरा यांच्या उमेदवारीनंतर पुन्हा भाजपचे झेंडे आणि चिन्हे घेऊनच अपक्षांनीही अर्ज दाखल केल्याने भाजपचा उमेदवार नेमका कोण असा प्रश्न मतदाराना पडला.भाजपचे विधानसभेचे दावेदार समजले जाणारे हरिशचंद्र भोये सुरेखा थेतले, मधुकर खुताडे यांनी सवराच्या उमेदवारीला जोरदार विरोध करत आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. तिन्ही अपक्षांनी एक सोबत रॅली काढत भाजपचेच झेंडे वापरल्याने एकच खळबळ उडाली आहे.बोईसरला ९ उमेदवारी अर्ज दाखलबोईसर : बोईसर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शुक्रवारी एकूण ९ उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यामध्ये बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ११ उमेदवारांनी १७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बहुजन विकास आघाडीतर्फे राजेश पाटील, विष्णू कडव, दिनकर वाढाण (मनसे), किरण मोरे आणि सुनिल गुहे (बहुजन समाज पार्टी), राजेसिंग कोळी (वंचित बहुजन आघाडी), श्याम गवारी (भारतीय ट्रायबल पार्टी), रुपेश धांगडा (संघर्ष सेना), सदू आंधेर- अपक्ष यांनी शुक्रवारी अर्ज भरले. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे आ. क्षीतिज ठाकूर, बविआचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील, माजी खासदार बळीराम जाधव व त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उमेदवाराबरोबर उपस्थित होते. बविआतर्फे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेस