शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

Navratri 2020: छुप्या गरब्यांवर पोलिसांची करडी नजर; गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 07:34 IST

आज घटस्थापना, अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके सज्ज

वसई : यंदा कोरोनाच्या सावटात नवरात्रोत्सव शनिवारपासून सुरू होत आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे या वेळी नवरात्रोत्सवाची धामधूम दिसणार नाही. पारंपरिक मंडळांना साधेपणाने उत्सव साजरा करण्याची परवानगी असली तरी रास-दांडिया आदी प्रकारचा गरबा खेळण्यावर मात्र प्रशासनाचे निर्बंध कायम आहेत. यामुळे नियम मोडून गृह संकुलांच्या आवारात गरब्याचे छुप्या पद्धतीने आयोजन करणारे आता पोलिसांच्या रडारवर येणार आहेत. दरम्यान, वसई-विरार शहरात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके सज्ज केली असल्याची माहिती वसई विभागाचे डीसीपी संजय पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव व  लॉकडाऊनमुळे गणेशोत्सवासह सर्वच सणांवर निर्बंध घालण्यात आले. नवरात्रोत्सव व गरब्याचा वसई-विरार शहरात व ग्रामीण भागातही एक वेगळाच उत्साह असतो. मात्र, लॉकडाऊनमधून मिळालेली शिथिलता पाहता नवरात्रोत्सवात नागरिक एकत्र आल्यास गणेशोत्सवानंतर आलेल्या कोरोना लाटेसारखी लाट पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची यंत्रणा या वेळी अधिक सतर्क राहणार आहे. यामध्ये तक्रारच काय तर साधा व्हिडीओदेखील प्राप्त झाला तरी पोलीस कारवाई करतील, असे डीसीपी पाटील यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये, यासाठी गृहसंकुलाच्या आवारातील गरब्याला बंदी असून गृह संकुलांत कोरोनाचे निर्देश तोडून गरब्याचे आयोजन केल्यास आयोजक व खास करून त्या त्या हौसिंग सोसायटीच्या कार्यकारी संचालक मंडळावर  योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा डीसीपी संजय पाटील यांनी दिला आहे.  

कोरोनामुळे नवरात्र साधेपणाने साजरी करायची असून सरकारने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. कुठल्याही छोट्या-मोठ्या गृहसंकुल, हौसिंग सोसायटीत गरबे, दांडिया खासकरून डीजे, साउंड वाजवता येणार नाहीत.  किंबहुना गरबे होणारच नाहीत याची दक्षता त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पथके नेमली आहेत. - संजय पाटील, डीसीपी, मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस

यंदा दुर्गामातेच्या मूर्तींमध्ये निम्म्याहून अधिक घट

कोरोनाच्या संकटात यंदा गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करण्यासाठी शासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. दरम्यान, यंदा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याबरोबरच गरबाचे आयोजन न करण्याचे आवाहन करण्यात आल्याने अनेक भाविकांनी दुर्गामातांच्या मूर्त्यांची केलेली बुकिंग रद्द केली आहे.  गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सवातही दुर्गामातांच्या मूर्त्यांची बुकिंग रद्द झाल्याने मूर्तिकारांना आर्थिक फटका बसला आहे. कोरोना विघ्ननामुळे त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ ओढवली आहे. गणेशोत्सवात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने अनेक निर्बंध लादले होते. त्यानंतरही अनेक ठिकाणी नियम डावलून नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात राज्यात करोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले होते. नवरात्रोत्सवातही अशाच प्रकारे नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोना काळ असल्याने यंदा निम्म्याहून अधिक मूर्त्यांची घट झाली आहे. बुकिंगच रद्द झाल्याने मूर्ती कारागिरांना हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :Navratriनवरात्रीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या