गोवणे शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे जाणार मंगळ ग्रहावर, पहिल्या इयत्तेच्या 36 विद्यार्थ्यांची नावनोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 07:52 PM2019-07-08T19:52:44+5:302019-07-08T19:53:34+5:30

नासा नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्टरेशनचे  “मंगळरोव्हर 2020“ हे अंतरीक्षयान  मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे.

The names of the school students will be going to Mars | गोवणे शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे जाणार मंगळ ग्रहावर, पहिल्या इयत्तेच्या 36 विद्यार्थ्यांची नावनोंदणी

गोवणे शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे जाणार मंगळ ग्रहावर, पहिल्या इयत्तेच्या 36 विद्यार्थ्यांची नावनोंदणी

Next

-अनिरुद्ध पाटील 
डहाणू/बोर्डी -  नासा नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्टरेशनचे  “मंगळरोव्हर 2020“ हे अंतरीक्षयान  मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. या यानावरील स्टेन्सिल्ड चिपवर नावे पाठविण्याची संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गोवणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावाची नोंद शिक्षक पावबाके यांनी रविवार, 7 जुलै रोजी पहिल्या इयत्तेतील 36 विद्यार्थ्यांची नावनोंदणी केली.

नासाच्या पसाडेना, कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या ( JPL ) मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरी मध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या ( 75 नॅनोमिटर ) रुंदीत नागरिकांकडून नोंदविण्यात आलेली नावं स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे मावतील. ह्या चिप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जातील . "या ऐतिहासिक मंगळ अभियानासाठी रोव्हर तयारी करत असताना, सर्वजण या नव्या मोहिमेत सामील व्हावेत, सर्वाना याची माहिती व्हावी असे आम्हाला वाटते असे "नासाच्या वॉशिंग्टन येथील सायन्स मिशनचे डारेक्टरेट" (SMD) थॉमस झुरबुचेनचे म्हणणे आहे.

या मोहिमेअन्तर्गत गोवणे शाळेतील विद्यार्थ्यांचीही  नावं या ग्रहावर जाण्याकरीता त्याची ऑनलाईन नोंदणी केली असून त्या सर्वांचे ऑनलाइन बोर्डिंग पास ही उपलब्ध झाल्याचे पावबाके यांनी सांगितले. विशेषतः मराठी भाषा आणि मराठी शाळा यांची अस्मिता जपत मराठीमधे त्यांची नोंदणी केली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे किंवा शाळेचे नाव 30 सप्टेंबर 2019 च्या रात्री 11.59 पर्यंत मंगळावर पाठवण्याकरीता  mars.nasa.gov या संकेतस्थळावर नोंदणी करु शकता. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासह, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तसेेेच अवकाश संशोधन शास्त्राचा प्रचार प्रसार करण्याची सुवर्ण संधी असल्याचे पावबाके म्हणाले. 

रोव्हर 2020 हे यान "ऍटलस V 541" या रॉकेटच्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल इथल्या सैन्य दलाच्या तळावरून 17 जुलै 2020 ते 5 ऑगस्ट 2020 मध्ये लॉन्च केले जाणार आहे. ते 2021च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहचण्याची शक्यता आहे.

या उपक्रमांतर्गत आपले नाव मंगळावर पाठवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा आणि आपला बोर्डिंग पासही https://go.nasa.gov/Mars2020Pass
मिळवता येतात.

Web Title: The names of the school students will be going to Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.