शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मतदार यादीतून नाव गायब : श्वेता पाटील-पिंपळे यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 02:55 IST

पालघर नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ.श्वेता पाटील-पिंपळे यांनी आपले नाव मतदार यादीतून नाव वगळण्याच्या कट हितशत्रूंनी रचल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाº्यांकडे आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.

पालघर : पालघर नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ.श्वेता पाटील-पिंपळे यांनी आपले नाव मतदार यादीतून नाव वगळण्याच्या कट हितशत्रूंनी रचल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाº्यांकडे आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र ज्या अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केला आहे त्याच्या विरोधात पोलिसात तक्र ार मात्र दिलेली नाही.पालघर नगर परिषदेत एकूण 28 नगरसेवकांचे संख्याबळ असून शिवसेनेचे 17 नगरसेवक निवडून आल्याने मागील पाच वर्षांपासून सेनेची सत्ता अबाधित आहे. राष्ट्रवादीचे 10 नगरसेवक तर काँग्रेसची एक नगरसेविका निवडून आली आहे. साधारणपणे 50 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून ह्या संख्येत 8 ते 10 हजार मतदारांची वाढ झाली आहे. 2014 च्या निवडणुकीत अल्याळी भागात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्या नंतर पालघर तहसीलदार कार्यालयातील एका कर्मचार्यांची बदली बोईसर येथे करण्यात आली.हा लोकशाहीचा खून असून मतदार यादीतून आपले नाव वगळण्याचा कट राजकीय हेतुने रचला असल्याचा आरोप करून सोमवारी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे ह्यांच्याकडे पाटील यांनी दिला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो मंजूर ही केला.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ राष्ट्रवादीचे गटनेते मकरंद पाटील ह्यांच्या वृंदावन पार्कात लावलेल्या होर्डिंग्ज वरून मकरंद पाटील, डॉ.श्वेता पाटील ह्यांचे फोटो-नावे गायब होणे, डॉ.श्वेता पाटील ह्यांना नगराध्यक्षपद मिळावे ह्यासाठी पक्ष बदलाची चाललेली धावपळ, त्यांचे मतदार यादीतून नावेच गायब करण्याचा प्रकार,असा सायबर गुन्ह्याचा गंभीर प्रकार घडुनही अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्या बाबतची उदासीनता,एकदम 8 ते 10 हजार मतदारांची वाढलेली संख्या हे सारे शंकास्पद आहे. ही नावे वगळण्याची प्रक्रि या मुंबईतून सुरू असून प्रति फॉर्म 400 रु पयांचा दर सुरू असल्याची चर्चाही सुरू आहे.माझा मतदार यादीतून वगळणी संदर्भात 7 नंबरचा अर्ज आढळून आला व वेळीच हे लक्षात आले नसते तर कदाचित नाव वगळले जाण्याची शक्यता होती.या घटनेचा निषेध म्हणून मी माझा राजीनामा जिल्हाधिकाºया कडे दिला आहे.आणि तो मंजूरही करण्यात आला आहे.- डॉ. श्वेता मकरंद पाटील,माजी नगरसेविका

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliticsराजकारण