शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

खून करुन फरार झालेल्या आरोपीला जहाजातून अटक; २०० पेक्षा अधिक जहाजांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:32 IST

नायगावच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

मंगेश कराळे

नालासोपारा : खुन करुन फरार झालेल्या आरोपीला गुजरात राज्यातील द्वारका बंदर येथील जहाजातून अटक करण्यात नायगावच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी शनिवारी दिली आहे.

नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसई पूर्वेकडील कामण येथील सेनरजी हायजील कंपनी येथे काम करणारे कामगार दिलीप सरोज (मयत) व सुनिल प्रजापती (आरोपी) यांना कंपनीचे मालक प्रकाश धुंकर चामरिया यांनी ७ सप्टेंबरला दोघांच्या जेवणाच्या खर्चासाठी एकत्रित रक्कम आरोपी सुनिल प्रजापती याच्या बैंक खात्यात दिले होते. परंतु आरोपी सुनिल याने नमुदची रक्कम यातील मयत दिलीप सरोज यांस दिली नाही. सदर कारणावरुन त्यांच्या दोघांमध्ये वाद होवून सुनीलने दिलीपला कोणत्या तरी साधनाने डोक्याच्या उजव्या व मागील बाजूला, दोन्ही डोळ्यांवर व उजव्या हाताला गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील जखमी दिलीप याच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. नायगांव पोलिसांनी आरोपीवर हत्येची कलमे लावून गुन्ह्यात वाढ केली होती.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे दोन वेगवेगळे पथके बनवुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हा ओका, व्दारका बंदर, गुजरात येथील जहाजात  लपून राहत असल्याचे निष्पन्न झाले. ओका बंदरालगत असणान्या सुमारे २०० पेक्षा जास्त जहाजांची तपासणी करुन आरोपी सुनील प्रजापती (३५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यावर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यावर अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोनि अभिजीत मडके हे करीत आहेत.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त पौणिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजीत मडके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश केकान, पोउपनिरी ज्ञानेश्वर आसबे, अनिल मोरे, सफौ बाबाजी चव्हाण, पोहवा शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहीते, सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, पांडुरंग महाले, बाळासाहेब भालेराव आणि अमोल बरडे यांनी पार पाडली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Murder Suspect Arrested on Ship After Extensive Search

Web Summary : Naigaon police arrested Sunil Prajapati from a Gujarat ship for the murder of Dilip Saroj. A financial dispute led to the crime. Police searched over 200 ships to locate and apprehend him. Investigation ongoing.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGujaratगुजरात