बडतर्फ केल्याच्या रागातून मनपा परिवहनच्या; बस चालकाचा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 20:03 IST2023-07-08T20:03:04+5:302023-07-08T20:03:18+5:30
सातीवलीच्या डेपोतील शनिवारी दुपारची घटना

बडतर्फ केल्याच्या रागातून मनपा परिवहनच्या; बस चालकाचा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न
नालासोपारा (मंगेश कराळे) : मनपाच्या पालिका परिवहन समितीचे ठेकेदार एस. एन. एनचे मालक विशाल बासू, डेपो मॅनेजर रविकिरण शेरेकर यांच्या त्रासाला कंटाळून व ठेकेदाराकडुन बडतर्फ केल्याच्या रागातून आणि या घटनेचा निषेध करत बस चालक भिमराव कासारे (४२) यांनी सातीवली डेपोमध्ये परिवहन कार्यालयासमोर शनिवारी दुपारी सर्वांसमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात केला.
इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना लगेचच उपचारासाठी मनपाच्या नागीनदास पाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच इतर कर्मचारीही परिवहन समितीचे ठेकेदार एस. एन. एन चे मालक विशाल बासू, डेपो मॅनेजर रविकिरण शेरेकर यांच्या त्रासाला कंटाळला आहे.