शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

आरक्षित भूखंडावरील महापालिकेचा फलक गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 11:50 PM

चुळणे येथील भोंगळ कारभार : बांधकाम विभाग अनभिज्ञ 

आशीष राणे  लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार महापालिकेच्या ‘एच’ प्रभाग समितींतर्गत चुळणे परिसरातील एका विकासकाने टोलेजंग इमारती बांधून आरक्षण पडलेली जागा मनपाला बक्षीसपत्राने दिली. मात्र, याच ईएसआर आरक्षित भूखंडावरील आरक्षण उठले नसतानाही तेथील मनपाचा फलक गायब झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. हा फलक त्या जागेवर पुन्हा कधी लागणार आहे, असा सवाल केला जात आहे.पाण्याच्या टाकीसाठी आरक्षित असलेला हा भूखंड बांधकाम व्यावसायिकाने बक्षीसपत्राने हस्तांतरित केला. मात्र, प्रत्यक्षात तो आजही महापालिकेला हस्तांतरित केलेला नाही, असे नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या जागेवर दोन ते तीन वर्षांपूर्वी वसई-विरार शहर महापालिकेची मालकी दर्शविणारा नामफलक अस्तिवात होता. मात्र, कोविड काळात हा फलकच येथून गायब झाला आहे. महापालिकेने याची तक्रार पोलिसात केलेली नाही. याबाबतची तक्रार सुयोग नगरातील नागरिकांनी नगररचना व  ‘एच’ प्रभाग समितीच्या तत्कालीन व सध्याच्या  सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांच्याकडे केली असता, त्यांनी याबाबत आरक्षित भूखंड असलेल्या नवघर विभागातील सहाय्यक आयुक्त गिलसन घाेन्साल्वीस यांच्याशी बाेलण्याचा सल्ला दिला. तर अतिक्रमण विभागाचे अभय चौकेकर व बांधकाम उपअभियंता (ठेका) विवेक चौधरी हे सहाय्यक आयुक्त शिंदे यांना सांगा, असे सांगत आहेत. या प्रकारामुळे पालिकेच्या नगररचना व प्रभाग समितीच्या कार्यपद्धतीवरच संशय व्यक्त हाेत आहे.आयुक्तांनी आरक्षित भूखंडांची चौकशी करावीशहरातील आरक्षित जमिनी व भूखंड अथवा ३७ (१)ची कुठली प्रकरणे आजपर्यंत  प्रलंबित आहेत, याची चौकशी होणे गरजेचे आहे. तर या प्रश्नी आजपर्यंत प्रशासकीय  कुठलीही माहिती वा त्यावर ठोस कारवाई केलेली दिसून आलेली नाही.