शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
5
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
6
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
7
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
8
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
9
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
10
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
11
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
12
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
13
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
14
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
15
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
16
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
17
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
18
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
19
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
20
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!

जेवढे पाणी, तेवढे पैसे, फुकट पाणी बंद; नगर परिषदेचे नुकसान टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 23:20 IST

२६ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठ्याची ‘चावी’ नगरपरिषदेच्या हाती

हितेन नाईकपालघर : पालघर २६ गावे नळ पाणीपुरवठा योजनेतून नगरपरिषदेमार्फत २० गावांना वितरित करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या बिलाची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीकडून भरली जात नसल्याने नगरपरिषदेला २ कोटी ३२ लाख ८९ हजार ५२८ रुपयाचा तोटा सहन करावा लागतो आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत याचे पडसाद उमटत असल्याने संबंधित २० गावांच्या लाईनवर मीटर्स बसविण्यात येणार असून फुकट पाणी वापरणाºया गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याची चावी आता नगरपरिषद प्रशासनाच्या हाती राहणार आहे.

पालघर आणि २६ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना नोव्हेंबर २००९ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर ही योजना देखभाल तसेच दुरुस्तीसाठी पालघर नगरपरिषदेकडे नोव्हेंबर २०११ पासून हस्तांतरित करण्यात आली आहे. तेव्हापासून या योजनेची संपूर्ण देखभाल आणि दुरु स्ती पालघर नगर परिषदेकडून करण्यात येते. या योजनेसाठी मनोर पाटबंधारे विभागाचे मासवण सूर्या नदीतून पाण्याचा उपसा करण्यात येतो आणि शेलवली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध होऊन पालघर आणि अन्य २६ गावांना त्याचा पुरवठा केला जातो.

या योजनेतून नागरी भागात म्हणजे पालघर नगर परिषद ७३.०८ टक्के व ग्रामीण भागात २६.९२ टक्के पाणी पुरवठ्याचे प्रमाण ठरवून दिले आहे. मात्र, सदर योजना सुरू झाल्यापासून ग्रामपंचायत उमरोळी, सातपाटी, बिरवाडी, हरणवाडी, खारेकुरण यांच्या मुख्य वाहिनीवर मीटर बसविलेले आहेत तर अन्य ग्रामपंचायतींना आजही विनामीटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना योजनेतून किती टक्के प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो याचा ताळमेळ नाही. सदर ग्रामपंचायतींना नगरपरिषद अथवा पंचायत समितीकडून पाणी बिलेच देण्यात आली नसल्याने बिले भरण्याच्या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे सुमारे १५ गावे ११ वर्षांपासून कुठलीही बिले न भरता फुकट पाणी वापरत असल्याचे नगरपरिषदेचे म्हणणे आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका नगरपरिषदेला बसत आहे.

ग्रामपंचायतींना पाणी बिले देण्याकरता नगरपरिषदेच्या ६ जून २०१९ च्या सर्वसाधारण सभेच्या ठराव क्र मांक ९ अन्वये मंजुरी मिळाली असून उर्वरित ग्रामपंचायतींना पाणी वितरणाचे मीटर बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाल्यास पाणी वितरणाचे कामाला तत्काळ सुरु वात करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी लोकमतला सांगितले.सद्यस्थितीत फक्त पंचायत समितीकडून मासवण पंपिंग हाऊस व शेलवली जलशुद्धीकरण केंद्र येथील मासिक बिलावर २६.९२ टक्के रक्कम नगरपरिषदेस देण्यात येत आहे. ही रक्कम वापरलेल्या पाण्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. पाणीपुरवठा पाणीपट्टीची मासिक वसुली वीस ते पंचवीस लाख एवढी होत आहे. सदर योजना चालविण्यासाठी आस्थापना खर्च, देखभाल खर्च, औषधे, कच्चे पाणी वगैरे अंदाजित मासिक खर्च तीस ते पस्तीस लाख एवढा होत आहे.

अकरा वर्षांच्या कालावधीत योजनेसाठी वापरलेल्या पंपाचा कालावधी जवळपास संपत आला असून सदर पंप प्रतिदिन २२ ते २४ तास सुरू असल्याने पंप हाऊसवरील मोटार पंप आणि इतर साहित्य नादुरुस्त होते आहे. त्यामुळे एक जास्तीचा मोटार पंप खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रस्तावित करणे आवश्यक असून त्यासाठी मोठा खर्च येणार असून नगरपरिषदेचे आर्थिक गणित थोडे कोलमडले आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा अपुरा पडण्याची भीतीपालघर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत सातपाटीसह शिरगाव, धनसार आदी गावांची जानेवारी २०२० अखेर १ कोटी ३७ लाख ५४ हजार १४७ रुपयांची थकबाकी असून सातपाटी गावाची थकबाकी ५६ लाख ३५ हजार ६३३ रु पये इतकी, शिरगाव १ लाख ९३ हजार ३४०, धनसार २ लाख ५५ हजार २०१, मोरेकुरण १३ लाख १० हजार २७२, कोळगाव ८९ हजार ९०९३, दापोली २७ लाख ६२ हजार ९५६, उमरोळी ग्रामपंचायतीची ७७ हजार ५८०, बिरवाडी ८५ हजार ७६९ इतकी आहे. सदरची योजना ही पूर्णपणे तोट्यात सुरू आहे. त्यामुळे पालघर व २६ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना यापुढे सुरू ठेवणे नगर परिषदेच्या आर्थिक स्थितीवर ताण पडण्याची शक्यता आहे. या योजनेत एकूण २८ गावांचा समावेश असून त्यातील पालघर, टेंभोडे, नवली, अल्याळी, लोकमान्यनगर आदी आठ गावे ही पालघर नगरपरिषद हद्दीत आहेत आणि उर्वरित २० गावे जिल्हा परिषद पालघर अंतर्गत ग्रामीण भागात आहेत. या गावांची लोकसंख्या पाहता या योजनेचा पाणी पुरवठा अपुरा पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Waterपाणी