मोटारसायकल चोरटे पकडले

By Admin | Updated: January 13, 2017 05:42 IST2017-01-13T05:42:27+5:302017-01-13T05:42:27+5:30

पोलिसांनी शहरातील व ग्रामीण भागात मोटार सायकली, सोलर बॅटरी व अन्य साहित्याची चोरी करणा-या टोळीला अटक

Motorcycles caught on the thieves | मोटारसायकल चोरटे पकडले

मोटारसायकल चोरटे पकडले

जव्हार : पोलिसांनी शहरातील व ग्रामीण भागात मोटार सायकली, सोलर बॅटरी व अन्य साहित्याची चोरी करणा-या टोळीला अटक केली. यामध्ये एका अल्पवयीन चोराचा समावेश आहे. त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलीस कास्टडी सुनावण्यात आली आहे.
जयराम जीवा मोरघा-१७ वर्ष गाव दाभोसा, संजय लक्ष्मण कोकाटे- २० वर्ष (खंड्या) गाव जांभुळमाथा, रिंकू उर्फ महमद ऐनतुला (३०) यांचा त्यात समावेश आहे.
प्रारंभी यातील एकाला अटक करण्यात आली. त्याच्या कबुलीतून त्याच्या घरातून चोरीचा मुद्देमाल साहित्य जप्त करण्यात आला. या तिघा चोरांनी जव्हारसह, विक्र मगड, झाडपोली, वाडा शिरीशफाटा, कोणसाई, सासनेखैर, अंबाडीनाका येथून अनेक मोटार सायकली व सोलर बॅटरी व अन्य वेगवेगळे साहित्य चोरले आहे. हे तिघे वर्षभर वेगवेगळे साहित्य व मोटार सायकल चोरी करून ते विकत होते. त्यांच्याकडून अजूनही मोठ्या चोऱ्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी- सुरेश गाडगे, पोलीस निरीक्षक- घनश्याम आढाव, पीएसआय- एम.सी.शेलार, पी.बी.शेळकंदे, पो.ह. वी.जी.दिवे, पोलीस दिलीप जनाठे, मनोज सानप, योगेश गावित यांनीही कामगिरी पार पाडली. त्यांनी चोरलेल्या गाड्या कोणाला विकल्या? त्या अखंड विकल्या की, त्याचे सुटे भाग करून विकले. याचाही शोध पोलीस घेत आहेत. यामुळे जव्हार तालुका व आसपासच्या परिसरातील दुचाक्यांच्या चोऱ्यांना आळा बसेल अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (वार्ताहर)

Web Title: Motorcycles caught on the thieves