मोटार अपघातात आई, मुलगा, भाचा जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 02:47 IST2018-07-09T02:47:37+5:302018-07-09T02:47:48+5:30

मुंबई अहमदाबाद महामार्गावर हलोली पाटील पाडा येथे ट्रेलरच्या धडकेने दुचाकी वरुन प्रवास करणारे आई, मुलगा व भाचा जागीच ठार झाले.

 Mother, son, brother killed in the car accident | मोटार अपघातात आई, मुलगा, भाचा जागीच ठार

मोटार अपघातात आई, मुलगा, भाचा जागीच ठार

मनोर - मुंबई अहमदाबाद महामार्गावर हलोली पाटील पाडा येथे ट्रेलरच्या धडकेने दुचाकी वरुन प्रवास करणारे आई, मुलगा व भाचा जागीच ठार झाले. मनोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून अधिक तपास पंकज पाटील करीत आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरून मुंबईच्या दिशेने इनोव्हा कार जात होती. त्या गाडीच्या इंजिनमध्ये आवाज झाला म्हणून ते बघण्या साठी चालकाने गाडी उभी केली असता त्यांच्या मागुन येणाऱ्या दुचाकीचा तोल सुटला. तिला त्याच दिशेने जाणाºया एका ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने ती त्या इनोव्हाला जाऊन धडकली त्या वेळी तिच्यावर स्वार असलेले आई कामिनी काशिनाथ मेघवले (६०), निखिल काशिनाथ मेघवले (२८) रा. दंखिंड मुलगा, नमय संतोष पाटील (२०) रा. गोवाडे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. नावझा गावात बहिणीच्या घरी कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाला.
 

Web Title:  Mother, son, brother killed in the car accident

टॅग्स :Accidentअपघात