शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सनियंत्रण समिती कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:41 IST

झपाट्याने वाढत जाणाऱ्या नागरीकरणामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्वच महापालिकांच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत चालली आहेत.

नारायण जाधव ठाणे : झपाट्याने वाढत जाणाऱ्या नागरीकरणामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्वच महापालिकांच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत चालली आहेत. या अतिक्रमणांना वेळीच आळा बसावा, यासाठी हरित वसई संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेच्या अधिन राहुन राज्य शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मार्च २००९ मध्ये एक १४ सदस्यीय उच्चस्तरीय सनियंत्रण समिती स्थापन केली होती. या समितीने ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे व अनुशंगिक प्रश्नांचा सखोल अभ्यास करून आवश्यक त्या उपाययोजना करून कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी न्यायालयात सादर करावयाचा होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेली ही समिती कागदावरच राहिल्याने अनधिकृत बांधकामांचे पेव फुटल्याचे दिसत आहे.राज्यात नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत म्हणून अशा बांधकामांच्या याद्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए यासारख्या नियोजन प्राधिकरणांनी दुय्यम निबंधकांकडे द्याव्या व त्या याद्या आपल्या संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे. ही नवी बांधकामे तोडून टाकण्याकरिता नोटिसा बजावा व भूमाफियांना न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवण्याची संधी मिळू नये, याकरिता न्यायालयात लगेच कॅव्हेट दाखल करण्याचे आदेशही नगरविकास विभागाने गेल्या आठवड्यात दिले होते. त्या अनुषंगाने वाढत्या अनधिकृत बांधकामांची कारणमिमांसा करतांना ही समिती कागदावरच दिसत आहे.जिल्ह्यातील महानगरात अनधिकृत बांधकामांना फुटले पेवठाणे जिल्ह्यात आता पालघर जिल्ह्यात असलेल्या वसई-विरार महापालिकेसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह राज्यातील सर्वच मोठ्या शहरांतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आता आला आहे. नवी मुंबईतील दिघा येथे एमआयडीसीच्या जागेवरील ९९ अनधिकृत इमारतींच्या याचिकेनुसार डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, जिल्ह्यात दिवसेंदिवस सर्वत्र अनधिकृत बांधकामांचे इमले उभे राहतच आहेत. एका आकडेवारीनुसार अंदाजे ठाणे महापालिका हद्दीत ६७, ९३३ यात ५३४२ इमारती, केडीएमसी- १५६००० यात ७७ हजार इमारती, उल्हासनगर-१४ हजार, मीरा-भार्इंदर-१० हजार, भिवंडी- ५ हजार अनधिकृत बांधकामे आहेत.हरित वसई संस्थेने २००७ साली दाखल केलेल्या याचिकेवरील सुणावणीप्रसंगी २८ जानेवारी २००९ रोजी अनधिकृत बांधकामांच्या गंभीर प्रश्नावर न्यायालयाने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मार्च २००९ मध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही १४ सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये मुख्य सचिवांखेरीज महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नगरविकास, वित्त, मतद व पुनर्वसन या तिन्ही विभागांचे प्रधान सचिवांसह पर्यावरण, उर्जा, पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास व जलसंधारण या विभागांच्या सचिव, आयुक्त तथा नगरपालिका संचालक, कोकण विभागिय आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे पोलीस आयुक्त आणि नगरविकास विभागाच्या सचिवांचा सदस्य सचिवांचा समावेश होता.अहवाल गुलदस्त्यातचया उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने २००९ पासून आजपर्यंत गेल्या ९ वर्षांत या किती ठिकाणी भेटी दिल्या, किती बैठका घेतल्या, त्या कोठे घेतल्या, काय अभ्यास केला, कोणत्या सर्वंकष उपाययोजना शोधून अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेऊन त्याचा वेळोवेळी न्यायालयात अहवाल सादर केला, हे गुलदस्त्यात आहे. यामुळेच ठाणे जिल्ह्यात आजही सर्वच महापालिकांसह नगरपालिका, सिडको, एमआयडीसीसह ग्रामीण भागात अनधिकृत बांधकामे वाढतच आहेत.