पारंपरिक शेतीला बगल देत तरुण शेतकऱ्यांचे आधुनिक प्रयोग: पॉलिहाऊसमध्ये टोमॅटोची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:11 AM2020-07-04T00:11:00+5:302020-07-04T00:11:24+5:30

लहानपणापासून शेतीची प्रचंड आवड असल्याने ते शेतीसोबत सतत जोडून राहिले आहेत. पारंपरिक भातशेती हाच त्यांचा व्यवसाय. परंतु त्यांनी भाजीपाला व फूलशेती लागवड करण्याचा निर्णय घेतला.

Modern Experiments of Young Farmers aside from Traditional Farming: Tomato Cultivation in Polyhouse | पारंपरिक शेतीला बगल देत तरुण शेतकऱ्यांचे आधुनिक प्रयोग: पॉलिहाऊसमध्ये टोमॅटोची लागवड

पारंपरिक शेतीला बगल देत तरुण शेतकऱ्यांचे आधुनिक प्रयोग: पॉलिहाऊसमध्ये टोमॅटोची लागवड

Next

राहुल वाडेकर

विक्रमगड : पावसाळा तसेच गणपती उत्सवादरम्यान विविध बाजारांमध्ये भाजीपाल्याची मोठी तूट जाणवायला सुरुवात होत असल्याने याच काळात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव मिळत असतो. यामुळे पारंपरिक शेतीला बगल देत विक्रमगड तालुक्यातील शेतकरी आधुनिक भाजीपाला शेतीकडे वळले आहेत.

आज विक्रमगड तालुक्याची ओळख भाजीपाला व फुले उत्पादक तालुका म्हणून आहे. ओंदे वसुरी, हातणे, वाकडूपाडा भागात काही शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली आहे. विक्रमगडमधील भाजीपाला, मोगरा, सोनचाफा, गुलाब, झेंडू नाशिक, दादर मार्केटला जात असतो. त्यामुळेच की काय तालुक्यात शेतीला विशेष महत्त्व येऊ लागल्याने तरु ण शेतकरीही यात मागे नाहीत. शेती पारंपरिक पद्धतीने करणे अशी काहीशी अनेकांची धारणा असते. मात्र निसर्गाच्या लहरीपणापुढे अनेकांनी हात टेकले. त्यात तरुण शेतकºयाने परंपरागत शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीने १० गुंठे क्षेत्रातील पॉलिहाऊसमध्ये टोमॅटो लागवड केली. हा तरुण शेतकरी आहे विक्र मगड तालुक्यातील ओंदे येथील सुचित माणिक घरत. शेतकºयांची पत आणि शेतीची पोत कमी होत आहे. त्यातच निसर्गाचा माराही सहन करावा लागतो. परंपरागत शेतीने अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले. त्यामुळे तरु ण शेतकरी सुचित घरत यांनी मोठ्या कष्टाने पॉलिहाऊसमध्ये टोमॅटोची लागवड करत आज त्यांनी आधुनिक शेतीकडे वाटचाल धरली आहे.

लहानपणापासून शेतीची प्रचंड आवड असल्याने ते शेतीसोबत सतत जोडून राहिले आहेत. पारंपरिक भातशेती हाच त्यांचा व्यवसाय. परंतु त्यांनी भाजीपाला व फूलशेती लागवड करण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूच्या गावात मोगरा उत्पादक शेतकरी अधिक असल्याने त्यानुसार काय करावे, अशा विचारात असतानाच त्यांनी सोनचाफामध्ये गुलाब लागवड अंतरपीक व पॉलिहाऊसमध्ये भाजीपाला पीक घेण्याचे ठरवले. शेती क्षेत्रातील उच्चशिक्षित असलेल्या त्याचा भाचा राहुल पाटील याच्या मार्गदर्शनाखाली आपल्या वाडीत एक एकर क्षेत्रावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आणलेले सोनचाफाचे ३५० कलम व चिकू पिकामध्ये गुलाबाची कलमे लागवड केली. तसेच १० गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊस उभारले आहे. आज ते स्वत: बागेत काम करत फुलाचे व भाजीपाला उत्पादन घेत आहेत. त्याचा बागेला आज ६ वर्ष झाली आहेत. सोनचाफापासून उत्पादन मिळते. त्यात उत्सव, सण, लग्न हंगाम, नवीन वर्ष, पावसाला व गणपती सिझनला टोमॅटो मागणी अधिक असल्याने भाव वाढतात व उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे सुचित घरत यांनी सांगितले. या तरुण शेतकºयापासून प्रेरणा घेत आजूबाजूच्या शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला, सोनचाफा व गुलाबाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो व सोनचाफा गुलाबाची माहिती घेण्यासाठी येत असल्याने सुचित घरत व राहुल पाटील हे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करत आहेत.

बुरशी, अळ्यांपासून बचावासाठी विविध उपाययोजना
सिजेंटा कंपनीचे मायला जातीचे टोमॅटो त्यांनी आपल्या शेतात लावले आहेत. मायला या जातीची योग्य वेळी काढणी केली असता फळे टिकाऊ आणि वाहून नेण्यासाठी सोपी असतात, हे लक्षात आले. भाजीपाला पिकांच्या जमिनीचा पोत टिकवून झाडांना आवश्यकतेनुसार ठिबक सिंचन तंत्रज्ञानाने पाणी दिले जाते.

नत्र, स्फुरद, सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला दिले जाते. बुरशी, अळी आदींपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असतात. सूचित घरत आपल्या श्रमातून भाजीपाला व फुलशेती मागणीनुसार दादर मार्केट, नाशिक आदी ठिकाणी भाजीपाल्याची विक्र ी वाशी व सुरत मार्केटला करतात.

Web Title: Modern Experiments of Young Farmers aside from Traditional Farming: Tomato Cultivation in Polyhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.