महिला कलाकाराने मोबाइल चोराला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 00:29 IST2020-02-07T00:29:06+5:302020-02-07T00:29:37+5:30

विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोराला अटक केले आहे. जोगई राजेंद्र यादव (२०) असे त्याचे नाव आहे.

Mobile artist caught mobile thief | महिला कलाकाराने मोबाइल चोराला पकडले

महिला कलाकाराने मोबाइल चोराला पकडले

नालासोपारा : विरार पूर्वेकडील साईनाथ नगरच्या सिग्नलजवळ उभ्या असलेल्या महिला कलाकाराचा मोबाइल चोरून पळणाऱ्या चोराचा स्वत: पाठलाग करून त्याला पकडत तिने विरार पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोराला अटक केले आहे. जोगई राजेंद्र यादव (२०) असे त्याचे नाव आहे.

विरार पूर्वेकडील साईनाथ नगरमधील मथुरा अपार्टमेंटमध्ये राहणारी अनिता विशाल कश्यप (३०) ही बुधवारी रात्री अतिथी बार सिग्नल जवळील दुकानातून आईस्क्रीम घेत होती. त्याचवेळी एका चोरट्याने तिचा १० हजारांचा मोबाइल पळवला. तिने लगेच त्याचा पाठलाग करून पकडल्यावर स्थानिकांनी त्याला चांगलाच चोप देऊन विरार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. येथे अनेकदा अशा चोरीच्या घटना झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. ही महिला कलाकार सावधान इंडिया या कार्यक्रमात महिला पोलीस शिपायाची भूमिका करते.

Web Title: Mobile artist caught mobile thief