शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आयुक्तांविरुद्धच्या वादात मनसे एकाकी; शिवसेना, भाजप, काँग्रेस एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 12:45 AM

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर मंगळवारी राडा केला होता. मात्र याच मुद्यांवर आता इतर पक्षांनी मनसेविरुद्ध दंड थोपटले असून आम्ही आयुक्तांसोबत आहोत, अशी भूमिका घेतली आहे.

वसई : मनसे विरुद्ध पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. मात्र या रंगलेल्या सामन्यात महाराष्ट नवनिर्माण सेना एकाकी पडताना दिसत आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी आयुक्त गंगाथरन डी. यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बहुजन विकास आघाडीने मात्र सावधगिरी बाळगत या मुद्यावर आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही.मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर मंगळवारी राडा केला होता. मात्र याच मुद्यांवर आता इतर पक्षांनी मनसेविरुद्ध दंड थोपटले असून आम्ही आयुक्तांसोबत आहोत, अशी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे मनसेने आयुक्तांना गलिच्छ शिवीगाळ केल्याने इतर पक्ष आयुक्तांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. गुरुवारी विविध पक्षांच्या शिष्टमंडळांनी आयुक्तांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.वालीव कोविड केंद्राच्या दुरवस्थेबाबत तक्रार करण्यासाठी मंगळवारी दुपारी गेलेल्या मनसेच्या शिष्टमंडळाला आयुक्त गंगाथरन डी. यांनी भेटीची अनुमती देताना केवळ दोघेच भेटीला येतील, असेही स्पष्ट केल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व इतर कार्यकर्त्यांनी आयुक्तांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. त्यामुळे आयुक्त विरुद्ध मनसे असा वाद मागील दोन दिवस चांगलाच रंगला होता. मात्र मुख्यालयात आयुक्तांना गलिच्छ शिवीगाळ, पोस्टर, घोषणा व दमबाजी करणे वसईकरांना तसेच विविध राजकीय नेते मंडळींना अजिबात रुचले नाही. यामुळेच गुरुवारी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला, तसेच गरज पडली तर आयुक्तांच्या बचावासाठी आम्ही सर्व जण या मैदानात उतरू असेही त्यांनी ठणकावून सांगितले.या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव कॅप्टन नीलेश पेंढारी, भाजपचे नालासोपारा सचिव निरव शुक्ल, शिवसेनेचे नेते आणि विजय पाटील फाउंडेशनचे किरण शिंदे, काँग्रेसचे उपाध्यक्ष शम्स खान, शिवसनेचे उपविभाग प्रमुख नितीन चौधरी आदींचा समावेश होता.आयुक्त चांगले काम करत असून, त्यांनी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या मनमानीला लगाम घातला आहे. त्यांचे खच्चीकरण होत असल्यानेच चांगल्या कामासाठी आम्ही पाठिंबा दिला आहे.- कॅप्टन निलेश पेंढारी, सचिव, प्रदेश काँग्रेस कमिटी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार