भिवंडीत मनसे कार्यकर्त्यांचा खळ्ळ-खट्याक; टोरंट पावरची फोडली कार्यलये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 15:08 IST2021-01-07T15:07:52+5:302021-01-07T15:08:23+5:30
शहरातील अंजूरफाटा येथील ओसवालवाडी त्याचबबरोबर वंजारपट्टी नाका चावींद्रा रोड येथील टोरंट पवारांची कार्यालाये मनसे कार्यकर्त्यांनी फोडली.

भिवंडीत मनसे कार्यकर्त्यांचा खळ्ळ-खट्याक; टोरंट पावरची फोडली कार्यलये
- नितिन पंडीत
भिवंडी: वाढीव वीज बिल तसेच सक्तीची वीज बिल वसुली खोट्या वीज चोरीच्या पोलीस तक्रारी व टोरंट पावरचा मनमानी कारभार याविरोधात मनसेने गुरुवारी दुपारी आक्रमक पावित्रा घेत भिवंडीत वीज वितरण करणाऱ्या टोरंट पावर कंपनीची कार्यालये फोडली.
शहरातील अंजूरफाटा येथील ओसवालवाडी त्याचबबरोबर वंजारपट्टी नाका चावींद्रा रोड येथील टोरंट पवारांची कार्यालाये मनसे कार्यकर्त्यांनी फोडली. यावेळी टोरंट पावरच्या मनमानी कारभाराचा निषेध करत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली . मनसेचे भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.