अल्पवयीन तरुणीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 04:47 IST2019-03-07T04:47:50+5:302019-03-07T04:47:56+5:30
कांदिवलीत राहणाऱ्या १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर मावशीच्या नवऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

अल्पवयीन तरुणीवर बलात्कार
नालासोपारा : कांदिवलीत राहणाऱ्या १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर मावशीच्या नवऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. विरार येथील गोपचरपाडा येथे राहणाºया मावशीचा नवरा अजय सिंग याने नोव्हेंबर, २०१७ ते आतापर्यंत अनेक वेळा बलात्कार केला आहे. तिचे अपहरण करून काही काळ त्याने तिला नालासोपारा शहरातील एका घरातही कोंडून ठेवले होते. पीडितेच्या तक्रारीवरून या प्रकरणी बुधवारी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.