चप्पल चोरीच्या संशयावरुन अल्पवयीन मुलाचे अपहरण, फिनेलही पाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 23:54 IST2019-06-08T23:53:04+5:302019-06-08T23:54:01+5:30

चप्पल चोरीचा संशय। त्यातून घडला प्रकार

Minor kidnap kidnapped son, kidnapped son in vasai virar | चप्पल चोरीच्या संशयावरुन अल्पवयीन मुलाचे अपहरण, फिनेलही पाजले

चप्पल चोरीच्या संशयावरुन अल्पवयीन मुलाचे अपहरण, फिनेलही पाजले

नालासोपारा : पूर्वेकडील दुकानात काम करणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने पायातील चप्पल चोरल्याच्या रागातून त्याचे अपहरण करून त्याला जबरदस्तीने फिनाईल पाजून गाडीमध्ये बसवून विरार परिसरात नेऊन सोडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली आहे. अपहरण झालेल्या पीडित मुलाने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली हकीकत सांगितल्यावर शुक्र वारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे.

पूर्वेकडील डिमार्ट जवळील परिसरातील किराणा मालाच्या दुकानात काम करणारा 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा वृन्दावन रेसेडन्सी इमारतीमधील एका घरामध्ये पाण्याची बाटली देण्यासाठी मंगळवारी गेला होता. पाणी देऊन इमारतीमधून खाली उतरत असताना डी/402 मध्ये राहणाºया सुमित दुबे याने त्याला अडवले व त्याच्या पायातील चप्पल बघून माङया घराबाहेरील माझी चप्पल का चोरली अशी विचारणा करून रागाच्या भरात पीडित मुलाच्या खिशातील 600 रु पये आणि मोबाईल काढून घेतला. नंतर सुमित दुबे याने व त्याच्या 6 साथीदारांनी मुलाला जबरदस्तीने गाडीत बसवून त्याला फिनाईल पाजून दुखापत करत त्याला विरार रेल्वे स्टेशन परिसरात सोडून निघून गेले.

Web Title: Minor kidnap kidnapped son, kidnapped son in vasai virar