शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

कमानींच्या कामांवर लाखोंची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:05 AM

मीरा-भाईंदर महापालिका : नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याची मागणी

n  लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेत सध्या पालिकेच्या जागेवर प्रवेशद्वाराची कमान बनवण्याच्या कामांची धूम सुरू आहे. अगदी मलनिस्सारण केंद्रापासून रुग्णालयही पालिका आणि सत्ताधारी नगरसेवकांनी सोडलेले नाही.  कमानीसाठी तब्बल १५ ते २५ लाखांची उधळपट्टी सुरू असून अनावश्यक कमानींवर पैशांचा चुराडा करण्याऐवजी नागरिकांना चांगल्या सुविधा द्या, असा संताप व्यक्त हाेत आहे.

पालिकेचा वादग्रस्त सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरसेवकांचे असलेले साटेलोटे पुन्हा कमानीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहे. शहरात नगरसेवक निधीसह जनरल फंडातून कमानी उभारण्याची कामे  सुरू आहेत. मीरा रोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय इमारतीला दोन ठिकाणी कमानी प्रवेशद्वार बांधले जात आहेत. रुग्णालय वा इमारतीत दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे वाहन जाण्यासही अडथळा होणार आहे. रुग्णालयात आवश्यक सुविधा दिल्या जात नसताना कमानी उभारण्यावर लाखोंचा खर्च केला जात आहे.

मीरा रोड येथील पालिका मलनिस्सारण केंद्रातही दोन ठिकाणी प्रवेशद्वार कमानी बांधण्यात आल्या आहेत. मलनिस्सारण प्रकल्पच बंद असताना कामानींवर लाखोंचा खर्च करून काय साध्य होणार, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. पालिकेच्या एका नर्सरीला लाखो रुपये खर्च करून कमान बनविण्यात आली. मात्र त्यात काही हजार रुपयांची मोटार मशीन बंद असताना त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. असाच प्रकार जॉगर्स पार्कच्या कमानीबाबत आहे. येथेही दोन कमानी उभारल्या आहेत. या प्रकरणी पालिका शहर अभियंता शिवाजी बारकुंड व कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न घेतल्याने त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

शहरातील सत्ताधारी भाजपला जनतेच्या हिताची कामे करण्यापेक्षा नको त्या ठिकाणी वायफळ खर्च करण्यात जास्त रस दिसत आहे आणि यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे.- प्रमोद सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड