अंबाडीतील फेमस टायर्स सेंटरमध्ये लाखोंची चोरी

By Admin | Updated: February 7, 2017 03:50 IST2017-02-07T03:50:34+5:302017-02-07T03:50:34+5:30

अंबाडीतील फेमस टायर्स सेंटर या दुकानाचे शटर तोडून सहा लाखाचे टायर व बॅटरीज चोरल्याची तक्र ार गणेपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Millions of theft in Ambalati Famous Tears Center | अंबाडीतील फेमस टायर्स सेंटरमध्ये लाखोंची चोरी

अंबाडीतील फेमस टायर्स सेंटरमध्ये लाखोंची चोरी

वाडा : अंबाडीतील फेमस टायर्स सेंटर या दुकानाचे शटर तोडून सहा लाखाचे टायर व बॅटरीज चोरल्याची तक्र ार गणेपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
मालक इिम्तयाज अब्दुल रज्जाक मेमन यांनी सांगितले की, मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी शटर तोडून टायर व बॅटरी चोरल्या. या वेळी पांढऱ्या रंगाच्या गाडीतून हा सर्व माल घेऊन चोरटे पहाटे पसार झाले. ही सर्व घटना दुकानातील सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याने टिपली आहे. मात्र चोरट्यांनी तोंडावर फडके बांधल्याने ओळख पटलेली दुकानात कोणीही झोपलेले नसल्याने चोरी झाल्याचे सकाळी कळाले. तिची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता ती तत्काळ नोंदवून न घेता १० वाजता या असे सुनावले गेले.
मात्र, प्रत्यक्ष सहा लाखांचे टायर व बॅटरी चोरल्याची माहिती पोलीसांना दिली असता एफआयआरवर तीन लाख नव्याण्णव हजाराचीच नोंद करण्यात आल्याची माहिती मेमन यांनी दिली. या बाबत पोलीसांना विचारले असता ती एक तांत्रिक अडचण आहे. असे सांगून आमची बोळवण केल्याचे मेमन म्हणाले.
अंबाडीत रोजच चोऱ्यांचा सत्र सुरू आहे. मात्र, पोलीस कार्यालय ऊशाला असतांनाह चोऱ्या होतात हे ओरडून कोरड रहिवाशांच्या घशाला कोरड पडली आहे. प्रत्यक्ष पोलीस कार्यालयाच्या मागची टपरी फोडून काही दिवसापूर्वी चोरी झाली तिचाही मागमूस पोलीसांना अद्याप लागलेला नाही. मग ही पोलीसचौकी येथे आहे कशासाठी हा येथील नागरिकाचा सवाल आहे.
या दुकानातून विविध कंपन्यांचे ट्रक, टॅक्टर, कार, जीप, मोटरसायकल्स, स्कूटर्स, सायकल यांचे साधे व ट्यूबलेस टायर्स तसेच वेगवेगळ््या कंपन्यांच्या विविध वाहनांच्या बॅटरीज चोरीस गेल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Millions of theft in Ambalati Famous Tears Center