बॅगेत सापडली लाखोंची रोकड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 00:46 IST2019-01-26T00:46:17+5:302019-01-26T00:46:23+5:30
वैतरणा येथील रेल्वे स्थानकात एका सात वर्षीय मुलाच्या बॅगेत ६ लाख ४८ हजार ६४० रु पयांची रक्कम सापडल्याची घटना विरार येथे घडली आहे.

बॅगेत सापडली लाखोंची रोकड
वसई : वैतरणा येथील रेल्वे स्थानकात एका सात वर्षीय मुलाच्या बॅगेत ६ लाख ४८ हजार ६४० रु पयांची रक्कम सापडल्याची घटना विरार येथे घडली आहे. या मुलाला येथील वैतरणा स्थानकावर असलेल्या दोन दक्ष प्रवाशांनी रेल्वे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, चौकशी केली असता हा चुकून वैतरणा स्थानकात पोहचला असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, या दोन प्रवाशांना सतर्कतेमुळे मुलगा हा सुखरूप घरी पोहचला आहे.
वैतरणा रेल्वे स्थानकात सापडलेल्या मुलाचे नाव नसीर खान (७) असे असून तो नालासोपारा येथील अन्सारीनगर येथे राहत आहे. त्याच्या वडिलांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. तो काल रात्री आपल्या वडिलांसोबत बांद्रा येथे कॅटरिंगच्या आॅर्डरचे पैसे घेण्यासाठी गेला होता. यानंतर त्या दोघांनी त्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. वसई रेल्वे पोलिसांनी नसीर याच्या जवळची रक्कम ताब्यात घेऊन त्याची सविस्तर चौकशी करून योग्य ती तपासणी करून त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन केली असल्याचे वसई लोहमार्ग पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी सांगितले. प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल पोलिसांनी तुषार व मनिष यांचा सत्कार केला.