अवघ्या दहा जणांच्या उपस्थितीत विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 02:05 IST2020-06-22T02:05:20+5:302020-06-22T02:05:25+5:30

लाखो रुपयांचा खर्च वाचला असून त्यातून गरीब आदिवासी पाड्यांवर मदतीचा हात देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Marriage in the presence of only ten people | अवघ्या दहा जणांच्या उपस्थितीत विवाह

अवघ्या दहा जणांच्या उपस्थितीत विवाह

वसई : वसईतील चुळणे गावातील बविआचे ज्येष्ठ नेते, साहित्यिक तथा नगसेवक फ्रँक डिसोजा आपटे यांच्या कन्येचा विवाह अगदी साधेपणात अवघ्या दहा जणांच्या उपस्थितीत संपन्न झाला. रविवारी असलेले खंडग्रास सूर्यग्रहण, फादर्स डे आणि कोरोनाचे संकट या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने हा समारंभ पार पडला. यामुळे विवाह समारंभावर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचला असून त्यातून गरीब आदिवासी पाड्यांवर मदतीचा हात देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बऱ्याचदा विवाह समारंभ म्हटला की, लाखो रुपयांची उधळपट्टी होताना दिसत असते, मात्र बविआचे चुळणेचे नगरसेवक फ्रँक डिसोजा आपटे याला अपवाद ठरले. त्यांची सुकन्या रिचा हिचा विवाह जॉन्सन डिसा (गास) यांच्याबरोबर रविवारी अत्यंत साधेपणाने संपन्न झाला.

Web Title: Marriage in the presence of only ten people