शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सुरत येथील कुस्ती स्पर्धेत मनाली जाधव ठरली अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 2:50 AM

जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी, झडपोलीची आयकॉन खेळाडू मनाली जाधव हिने वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्या पाठोपाठच गुजरात येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत रौप्य पदक मिळवून भारतीय संघातील मधील आपले स्थान पक्के केले.

पालघर : जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी, झडपोलीची आयकॉन खेळाडू मनाली जाधव हिने वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्या पाठोपाठच गुजरात येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत रौप्य पदक मिळवून भारतीय संघातील मधील आपले स्थान पक्के केले.भिवंडीच्या दुगाड फाटा येथील शालेय जीवना पासून खेळात तरबेज असलेली मनाली जाधव ही २१ वर्षीय तरुणी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धा गाजवीत असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपली मोहर उठविण्यासाठी ती आता उत्सुक आहे. यवतमाळ येथील ६७ किलोच्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावून एका गरीब क्रीडापटूतही गुणवत्ता ठासून भरल्याचे तिने दाखवून दिले. आई-वडिलांचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू घडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवसरात्र स्वत:ला सरावात झोकून देत होती. मात्र एका स्पर्धेत झालेल्या अपघाताने तिचे हे स्वप्न उद्धवस्त होण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली. तिच्या पायाला झालेल्या गंभीर जखमेवर वेळीच उपचार न झाल्यास आपण कधीही कुस्ती खेळू शकणार नसल्याचे कळल्यावर ती नाउमेद झाली. एका साध्या पतपेढीत नोकरीला असणाऱ्या आईला एवढा खर्च पेलवणे शक्य नव्हते, अशावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष निलेश सांबरे ह्यांनी तिला मदतीचा हात देऊन तिचा शास्त्रक्रियेसह स्पर्धांचा व आहाराचा सर्व खर्च उचलला. आज तिच्या सोबत तिची छोटी बहीण गौरी जाधव ही कुस्तीपटूही जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी ला जोडली गेली असून ३० जानेवारी रोजी वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात खेळतांना मनाली हिने विजेतेपद पटकाविले. तर ६५ किलो वजनी गटात मनाली ची छोटी बहीण गौरी हिने उपविजेतेपद मिळविले. आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने इंडिया नॅशनल कॅम्प मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विविध भागांतील मल्ल जिवापाड मेहनत घेत असतात. मनाली हिने सुरत येथे २ फेब्रुवारी रोजी झालेल्या महिला ज्युनिअर नॅशनल कुस्ती स्पर्धेतील अंतिम सामन्यात रौप्य पदक मिळवून नॅशनल कॅम्प मध्ये प्रवेश मिळविल्याचे तिचे प्रशिक्षक ज्ञानेश्वर पाटील ह्यांनी लोकमतला सांगितले.तिच्यात असलेल्या उपजत गुणांमुळे मनाली देशाला आंतरराष्ट्रीय पदक मिळवून देऊ शकते हा विश्वास जाणवला.त्यामुळे तिला भविष्यात कसलीही कमी पडू देणार नाही.-निलेश सांबरे,अध्यक्ष-जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, झडपोली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार