लिंबानी सॉल्ट इंडस्ट्री केमिकल कंपनीत मोठा स्फोट; एकाचा मृत्यू, चार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 20:49 IST2025-09-18T20:48:45+5:302025-09-18T20:49:04+5:30
पालघर मनोर रस्त्यावरील जेपी नगर उद्योग नगर मध्ये असलेल्या कंपनीत पावडर वर रासायनिक प्रक्रिया करून रसायन बनवित असताना अचानक स्फोट झाला.

लिंबानी सॉल्ट इंडस्ट्री केमिकल कंपनीत मोठा स्फोट; एकाचा मृत्यू, चार जखमी
हितेन नाईक, पालघर:-पालघर -मनोर रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जे पी उद्योग नगर प्लॉट नंबर 21 एस 53 इथे असलेल्या लिंबानी सॉल्ट इंडस्ट्री ह्या केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास रासायनिक प्रक्रिया सुरू असताना मोठा स्फोट झाला.ह्या अपघातात दिपक अंधेर(३५ वर्ष) रा.मोरआळी ह्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.तर अन्य चार जखमी झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पालघर मनोर रस्त्यावरील जेपी नगर उद्योग नगर मध्ये असलेल्या कंपनीत पावडर वर रासायनिक प्रक्रिया करून रसायन बनवित असताना अचानक स्फोट झाला. ह्या स्फोटामुळे बॉयलर जवळ काम करताना उभे असलेले पाच कामगार जखमी झाले.कंपनी मालकाने ह्या सर्व जखमींना आपल्या कार मधून पालघरच्या रुग्णालयात दाखल केले. पालघरच्या ढवळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तीन कामगारांपैकी दीपक अंधेर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य,सुरेश कोम (५५ वर्ष) शेलवली (नवा पाडा)दिनेश गडग(५०) अंबाडी ह्यांच्यावर उपचार सुरू होते.तर पालघर मधील रिलीफ हॉस्पिटल मध्ये दाखल लक्ष्मण मंडळ ( 51 वर्ष) संतोष तरे (46 वर्ष) ह्या दोन गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. ह्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे