घटनेचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी

By Admin | Updated: January 30, 2017 01:23 IST2017-01-30T01:23:22+5:302017-01-30T01:23:22+5:30

राज्य घटना ही कोणत्याही धर्म ग्रंथ आणि कायद्यापेक्षा मोठी असून तितकीच पवित्र आहे. तिचे पावित्र्य राखणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबबदारी आहे

Maintaining sanctity is the responsibility of everyone | घटनेचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी

घटनेचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी

वसई : राज्य घटना ही कोणत्याही धर्म ग्रंथ आणि कायद्यापेक्षा मोठी असून तितकीच पवित्र आहे. तिचे पावित्र्य राखणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबबदारी आहे, असे प्रतिपादन जेष्ठ अभ्यासक अणि विचारवंत रमेश पतंगे यांनी स्व. सुरेश जोशी स्मृती दिनानिमित्त मर्देस नालासोपारा येथे केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे घटना निर्मितीमधील योगदान, स्वातंत्र चळवळ व तात्कालिक नेतृत्व अणि त्यांची देशहितासाठी मतभेदांपलीकडे जाऊन सर्वाना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, त्यांच्या दूरदृष्टी आणि सर्वसामावेशकतेमुळे भाषिक, धार्मिक आणि सामाजिक विविधता असून सुद्धा देश आज एकसंध अणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून प्रगती करीत आहे . यावेळी प्रमुख पाहुणे मिलिंद खानोलकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष गजभाऊ निजाई यांनी स्व. सुरेश जोशींच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजभाऊ नाईक यानी केले. तर प्रास्ताविक मनोज पाटील यानी केले. आनंद पाटील यांनी गीत सादर केले. मोठ्या संख्येने विविध राजकिय व सामजिक कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Maintaining sanctity is the responsibility of everyone