शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राजपथावर वसईतील विशाल ग्रुप करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 15:28 IST

विशाल ग्रुपचा जनसेवा सन्मान 

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : यंदा दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व वसईतील विशाल ग्रुप करणार आहे. नृत्य उत्सव २०२१ रोजीच्या डिसेंबरच्या  पहिल्या आठवड्यात व्हिडीओ राऊंड पार पडला होता त्यात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून एकूण ४० कला संघ सहभागी झाले होते. आणि अखेरीस या सर्व कला संघातून केवळ ५ संघ निवडण्यात आले आणि हे ५ संघ पुढे महाअंतिम फेरीसाठी देशाची राजधानी दिल्ली येथे पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे भारत देशाच्या विविध राज्यातून सहभागी ७० संघात महाअंतिम फेरी झाली. 

यामधे वसईचा विशाल ग्रुप अव्वल ठरला आणि सर्वत्र कौतुकाचा वर्षांव झाला. दरम्यान विशाल ग्रुपच्या या यशाचे कौतुक वसईतील सामजिक संस्थानी ही केलं यात नायगाव स्थित जनसेवा फाऊंडेशन व लोकदरबार यांच्या सयुक्त विद्यमाने कौतुकाची थाप म्हणुन या ग्रुपला जनसेवा मानपञ प्रदान करून विशाल ग्रुपला नुकतेच गौरविण्यात आले.

अर्थातच महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतिनिधीत्व आम्हां वसईच्या युवा कलाकारांना मिळणे हा आपल्या संपुर्ण वसईचा अभिमान आहे आणि जनसेवा फाऊंडेशनसारखी सामाजिक संस्था आमचा सन्मान करते हे भाग्य व बहुमान असल्याचे गौरवोद्गार विशाल ग्रुपचे प्रमुख रोशन घरत यांनी लोकमत शी बोलताना काढले इतकंच नाही तर याप्रसंगी लाखात भारी आमची यारी या अल्बमचे अनावरण देखील रविंद्र भाटकर सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRepublic Dayप्रजासत्ताक दिन