वसई : बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर, त्यांची पत्नी आणि माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर आणि मुलगा तसेच नालासोपाऱ्याचे विद्यमान आ. क्षीतिज ठाकूर आणि यांनी वसई विधान सभेसाठी मंगळवारी दुपारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, या तिघांनीही अर्ज दाखल केल्याने वसईसाठी आघाडीचा नेमका उमेदवार कोण हे मात्र ७ आॅक्टोबरपर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या घटकेला आपल्या उमेदवाराचे अर्ज दाखल करून विरोधकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणाºया बहुजन विकास आघाडीने आज आधीच अर्ज दाखल करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी मोठ्या संख्येने बविआचे कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षीतिज ठाकूर आणि माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Vidhan sabha 2019 : ठाकूर कुटुंबीयांनी दाखल केले वसई मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 23:54 IST